Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 TDS on EPF Withdrawal: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'पीएफ' काढताना आता कमी TDS द्यावा लागणार

Budget 2023

TDS on EPF Withdrawal:नोकरदार वर्गासाठी यंदाच्या बजेटमध्ये आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचाी भविष्य निर्वाह निधीमधून पैसे काढल्यास त्यावरील टीडीएस कमी द्यावा लागणार आहे. पाच वर्षपूर्ण होण्यापूर्वी ईपीएफ काढल्यास त्यावर टीडीएस कापला जातो.

पाच वर्षांची मुदत पूर्ण होण्यापूर्वी कर्मचारी भविष्य निधीमधून (EPF) पैसे काढल्यास त्यावर आता 20% टीडीएस आकारला जाणार आहे. यापूर्वी पॅनकार्ड न जोडलेल्या ईपीएफ खात्यातून  पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वी रक्कम काढल्यास त्यावर 30% टीडीएस कापला जात होता. बजेटमधील या तरतुदीने ईपीएफ नोंदणी असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Budget Announcement TDS on EPF Withdrawal cut to 20% from 30% )

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून काही विशिष्ट तातडीच्या कामांसाठी पैसे काढण्याची कर्मचाऱ्यांना सुविधा आहे. मात्र पैसे काढताना त्यावर टीडीएस कर लागू केला जातो. पॅनकार्ड संलग्न न केलेल्या ईपीएफ खात्यातून पैसे काढल्यास त्यावर 30% टीडीएस कर आकारला जात होता. मात्र याबाबत बजेटमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बजेटमधील नव्या नियमानुसार पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आणि पॅनकार्ड न जोडलेल्या ईपीएफ खात्यामधून रक्कम काढल्यास  त्यावर 30% ऐवजी 20% टीडीएस कापला जाणार आहे.

दरम्यान, पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वी ईपीएफमधून रक्कम काढल्यास ती रक्कम टॅक्सेबल इन्कम म्हणून ग्राह्य धरली जाते. त्यामुळे ज्यांना ईपीएफमधून पैसे काढायचे आहेत आणि त्यांचे पीएफ खाते पॅनकार्डशी संलग्न नाही अशांनी 1 एप्रिल 2023 पर्यंत वाट थांबण्याचा सल्ला जाणकारांनी दिला आहे.  

50 हजारांपेक्षा कमी रक्कम काढल्यास टीडीएस नाही (No TDS If Amount Less than Rs.50000)

कोणत्याही कंपनीत पाच वर्ष पूर्ण होण्याआधी ईपीएफ खात्यातून पैसे काढल्यास त्यावर 30% टीडीएस आकारला जातो. मात्र ही रक्कम 50 हजारांपेक्षा कमी असल्यास त्यावर टीडीएस आकारला जाणार नाही. कर्मचाऱ्याचे पॅनकार्ड ईपीएफ खात्याशी जोडलेले नसल्यास आणि ईपीएफमधील रक्कम 50 हजारांहून जास्त असल्यास त्यावर टीडीएस लागू होतो.