Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आज गुगलच्या डूडलवर बबल टी! लोक मोठया आवडीने हे पेय घेत असल्याने, या चहाच्या बिझनेसमध्येदेखील होत आहे मोठी वाढ..

Bubble Tea Doodle

Image Source : http://www.timesnownews.com/

Bubble Tea: आज गुगल, डूडलच्या माध्यमातून 'बबल टी' च्या लोकप्रियतेचा उत्सव साजरा करीत आहे. आपल्याकडे चहा हे पेय राष्ट्रीय पेय म्हणून घोषित करावे, यावर अनेक जोक्सदेखील झाले आहेत. कारण जीवनात चहाशिवाय मजा नाही म्हणणारेदेखील आहे. आज याच प्रकारातील बबल टी गुगलच्या डूडलवर दिसत आहे. खरं तर बबल टी म्हणजे काय, त्याचे फायदे याबाबत सविस्तर जाणून घेवुयात.

Bubble Tea Doodle: बबल टी या पेयाची कोविडमध्ये खूप चर्चा झाली होती. विशेष म्हणजे या पेयाची लोकप्रियता पाहता, याचे इमोजीदेखील तयार करण्यात आले होते. कोरोनामध्ये डालगोना काॅफीसोबत ‘बबल टी’ देखील मोठया प्रमाणात बनविण्यात आली होती. आज, 30 जानेवारी 2023 रोजी गुगलने (Google) याचे डूडल(Doodle) बनविले आहे. या बबल टी विषयी सविस्तर जाणून घेवुयात.

बबल टी म्हणजे काय (What is Bubble Tea) 

बबल टी हा एक चहाचा प्रकार आहे. ताइवानमध्ये हा चहा म्हणून घेतला जातो. हा चहा पर्ल टी, ब्लॅक टी, बिग पर्ल, पर्ल शेक, बोबा अशा अनेक नावांनी ओळखला जातो. बबल टी पिण्याची सुरूवात 1980 मध्ये करण्यात आली होती. या चहामध्ये साबुदाणा टाकण्यात येतो, म्हणून या चहाला बबल टी म्हणतात. सोबतच यामध्ये बर्फदेखील टाकला जातो. कोरोना दरम्यान या पेयाची लोकप्रियता इतकी वाढली होती की, 2020 मध्ये याचे इमोजीदेखील बनविण्यात आले होते.

परदेशात लांबच्या लांब रांगा (Long Queues Abroad)

1990 मध्ये बबल टी ची लोकप्रियता ही पूर्व व दक्षिण पूर्व आशियापर्यंत पोहोचली होती. हाॅगकाॅंग, चीन, जपान, व्हिएतनाम, सिंगापूर या देशात बबल टी चा स्वाद घेणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढली. येथील तरूणांचे हे खास पेय होते. एखाद्या दुकानात बबल टी चा कप घेण्यासाठी तासन् तास लोक रांगेत उभे राहू लागले होते. याची लोकप्रियता पाहता, आजकाल बबल टी आइसस्क्रीम, बबल टी पिज्जा, बबल टी टोस्त, बबल टी सुशी, बबल टी रेमन हे पदार्थदेखील लोक आवडीने खाऊ लागले आहेत.

बबल टी चा वाढतोयं बिझनेस (Bubble Tea is a Growing Business)

बबल टी च्या बिझनेसमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एका अहवालानुसार, अलिकडच्या काळात बबल टी ची लोकप्रियता कॉफीच्या तुलनेत 5 पटीने जास्त वाढली आहे. कोरोनानंतर याच्या विक्रीत आणखी वाढ झाली आहे. वास्तविक, बबल टी बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ग्रीन टीच्या बेसमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात. या गुणवत्तेमुळे हा चहा आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. वास्तविक, हा चहा आपली प्रतिकारशक्ती कमी करणारे मुक्त रॅडिकल्स काढून ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते. तसेच यामध्ये वापरल्या जाणाऱ्या फळांमध्ये ब्लूबेरी, स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. भारतात या बबल टी चा एक ग्लास साधारण 35 रूपयात मिळतो. (Bubble Tea Cost) त्यामुळे लोकं बबल टी पिण्यास प्राधान्य देतात. यावरूनच या चहाचा बिझनेसदेखील वाढला असल्याचे लक्षात येते. 

बबल टी चे फायदे (Benefits of Bubble Tea)

बबल टी आरोग्यासाठी गुणवान पेय आहे. चहाचा कर्करोगाच्या पेशींवर परिणाम होतो. या चहाच्या पेयाने यकृत, प्रोस्टेट आणि कॅन्सर सारख्या घातक आजारांचा धोका कमी होतो. रक्तदाब कमी करण्यासाठी देखील हा चहा खूप फायदेशीर आहे. हे पेय कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करू शकते. यामुळे स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित गंभीर आजार होण्याची शक्यताही कमी असते.

बबल टी रेसिपी (Bubble Tea Recipe)

बबल टी तुम्ही घरी सहज बनवू शकता. यासाठी तुम्हाला दोन कप पाणी, एक कप टॅपिओका बॉल्स, एक चमचा चहा पावडर, एक चमचा मध किंवा ब्राऊन शुगर, एक कप दूध आणि दोन चमचे बर्फाचे तुकडे घ्या. पाणी उकळल्यानंतर त्यात टॅपिओकाचे गोळे टाका आणि ते फुगू द्या. गोळे चांगले फुगले की गाळून ग्लासमध्ये काढा. आता एक कप पाणी गरम करून त्यात एक चमचा चहा पावडर घाला. त्यानंतर एका ग्लासमध्ये फुगलेले टॅपिओका बॉल्स टाका. त्यावर मध किंवा ब्राऊन शुगर मिक्स टाकून मिक्स करा. यामध्ये थंड चहा पावडरचे पाणी आणि दूध घालून मिक्स करा. तुमचा बबल टी तयार झाला.