Best Recharge Plan: सध्या ग्राहकांची आवड आणि गरजेनुसार सर्व टेलिकॉम कंपन्या(Telecom Company) वेगवगळे प्लॅन्सच्या ऑफर जाहीर करत आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनी 'BSNL' इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत आहे. त्यापैकीच एक 90 दिवसांची वैधता(Validity) असणारा व 22 रुपयांमध्ये मिळणाऱ्या प्लॅनबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर आज 'BSNL' च्या या प्लॅनबद्दल(Plan) अधिक माहिती जाणून घेऊयात.
22 रुपयांचा प्लॅन
ही ऑफर 'BSNL' च्या प्रीपेड(Prepaid) ग्राहकांसाठी असणार आहे. BSNL च्या 22 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये लोकल(Local) आणि STD व्हॉईस कॉलिंगची(Voice Calling) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी ग्राहकांना 30 पैसे प्रति मिनिट(Per Min) शुल्क मोजावे लागणार आहे. या प्लॅनची वैधता 90 दिवसांची असणार आहे. ग्राहकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की या प्लॅनमध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग(Free Voice Calling) आणि डेटाचा(Internet Data) लाभ घेता येणार नाही.
'ही' कंपनी आहे प्रतिस्पर्धी
रिलायन्स जीओचा(Reliance Jio) 25 रुपयांचा प्लॅन हा याचा प्रतिस्पर्धी प्लॅन मानला जाऊ शकतो. जिओचा 25 रुपयांचा प्रीपेड प्लॅन वापरकर्त्यांना सध्याच्या सक्रिय प्लॅनप्रमाणेच वैधता देत आहे. मात्र कंपनी यामध्ये ग्राहकांना 2GB डेटा(Internet Data) देखील उपलब्ध करून देत आहे.
'या' कंपन्या देखील देतात परवडणारे प्लॅन
Airtel आणि Vodafone idea या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना परवडणारे प्लॅन ऑफर करत आहेत. या कंपन्यांचे प्लॅन 22 रुपयांपेक्षा पेक्षा कमी असून दोन्ही कंपन्याच्या प्लॅनची किंमत 19 रुपये इतकी आहे.
एअरटेलच्या 19 रुपयाच्या प्लॅनची 1 दिवस वैधता असून यामध्ये ग्राहकांना 1GB डेटाचा लाभ मिळत आहे. याचप्रकारे 1GB डेटाचा लाभ Vodafone idea ने 19 रुपयांमध्ये दिला आहे, ज्याची वैधता 24 तास असणारा आहे. तसेच Vodafone idea अॅप्स, चित्रपट आणि टीव्ही शोचाही अतिरिक्त फायदा ग्राहकांना मिळत आहे.