First Flying Bike: बाइक प्रेमींसाठी एक आगळी-वेगळी बाइक आली आहे. ही बाइक रस्त्यावर नाही, तर हवेत उडणार आहे. जगातील ही पहिली फ्लाइंग बाइक असणार आहे. बाइक प्रेमींसाठी हे एक आश्चर्यच असणार आहे. या अजब बाइकचे नाव, किंमत व फीचर्स जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
बाइकचे नाव
या फ्लाइंग बाइकचे नाव ‘स्पीडर’ (Speeder) असे आहे. या बाइकला उडती बाइक (Flying Bike) असे ही म्हणू शकतो. जगातील या पहिल्या फ्लाईंग बाईकची बुकिंग सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही बाईक 30 मिनिटे ताशी 96 किमी वेगाने उडू शकते. या बाईकची सुरूवातीची किंमत 3.15 कोटी रुपये आहे.
कोणी बनविली ही बाइक
अमेरिकेच्या जेटपॅक एव्हिएशन कंपनीने फ्लाइंग बाइक तयार केली आहे. या बाइकच्या मुळ डिझाइनमध्ये चार टर्बाइनचा समावेश होता. मात्र आता शेवटच्या प्रोडक्शनमध्ये 8 टर्बाइन असणार आहेत. दोन टर्बाइन प्रत्येक कोपऱ्यात दोन बाईकच्या सुरक्षेसाठी असणार आहेत.136 किलो वजनाची ही स्पीडर बाईक असून 272 किलो वजन वाहून नेऊ शकते. या बाईकला रिमोटने देखील कंट्रोल करता येणार आहे. त्यामुळे ही जगातील पहिली फ्लाइंग बाइक ग्राहकांच्या पसंतीस पडेल असे वाटते.
कधी येणार बाजारत
जेटपॅक एव्हिएशन कंपनी ही जगातील पहिल्या फ्लाइंग बाइकचे चाचणी करत आहे. या बाइकला यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे. साधारण 2 ते 3 वर्षात कंपनीची 8 जेट इंजिनची स्पीडर फ्लाइंग बाईक बाजारात येऊ शकते. जर आपण काही वर्षाने हवेत बाइक उडताना पाहिले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
फायदेशीर ठरणार
कंपनीच्या सांगण्यानुसार, प्रत्यक्षात ही फ्लाइंग बाइक एअर युटिलिटी व्हेइकल आहे. म्हणजेच, थोडक्यात वैद्यकीय उपचारासाठी आणि अग्निशमन उद्देशांसाठी देखील याचा वापर करता येऊ शकतो. ही कंपनी आणखी उड्डाण करणाऱी वाहने बनविण्याच्या तयारीत आहे. काही वर्षातच तुम्हाला याबाबत अधिक माहिती मिळेल. यावर कार्य सुरू असल्याचे कंपनीने सांगितले आहे.