देशातील सरकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ इंडियाने (Bank of India) एफडीवरील (FD) व्याजदरात फेरबदल केला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार 26 मे 2023 पासून नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत. बँकेकडून ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षापर्यंतच्या कालावधीतील एफडीवर 3% ते 6% व्याजदर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे 1 वर्षाच्या एफडीवर ग्राहकांना 7% व्याजदर देण्यात येत आहे. या निमित्ताने बँक कोणत्या कालावधीसाठी किती व्याजदर देत आहे, जाणून घेऊयात.
'या' कालावधीसाठी मिळेल इतका व्याजदर
बँक ऑफ इंडियाच्या नव्या व्याजदरानुसार 7 दिवस ते 45 दिवसातील एफडीवर 3% व्याज देण्यात येत आहे. 46 दिवस ते 179 दिवसांच्या गुंतवणुकीवर 4.50% व्याज दिले जात आहे. तर 180 दिवस ते 269 कालावधीतील एफडीवर बँकेकडून 5% व्याज देण्यात येत आहे. तसेच 270 दिवसांच्या एफडीवर ग्राहकांना 5.50% व्याजदर देण्यात येत आहे.
1 ते 10 वर्ष कालावधीतील गुंतवणुकीवर मिळेल इतका व्याजदर
बँक आपल्या ग्राहकांना 1 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या एफडीतील गुंतवणुकीवर 7% पर्यंत व्याजदर देत आहे. तर 1 ते 2 वर्षाच्या कालावधीतील गुंतवणुकीवर ग्राहकांना 6% व्याजदर देण्यात येत आहे. 2 ते 3 वर्षातील एफडीवर 6.75% व्याज बँकेकडून ग्राहकांना देण्यात येत आहे. 3 वर्ष ते 5 वर्षापेक्षा कमी कालावधीत बँक ग्राहकांना एफडीवरील गुंतवणुकीसाठी 6.50% हिशोबाने व्याजदर देत आहे. तसेच 5 वर्ष ते 10 वर्षाच्या दीर्घ कालावधीसाठी ग्राहकांना 6% व्याज देण्यात येत आहे.
शुभ आरंभ मुदत ठेव योजना
भारतातल्या वृद्ध लोकांची अधिक चांगली काळजी घेतली जावी त्याचप्रमाणे त्यांच्याकडे लक्ष दिले जावे यासाठी बँक प्रयत्न करत आहे. विशेषत: आर्थिक बाबींचा विचार करून बँक ऑफ इंडियाने आपल्या शुभ आरंभ ठेव योजनेंतर्गत 80 आणि त्याहून अधिक वयाच्या अति ज्येष्ठ नागरिकांसह ज्येष्ठांसाठी विशेष मुदत ठेव योजना तयार केली आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्के आणि अति-ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.65 टक्के अतिरिक्त व्याजदरासह त्यांना आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न करते. बँक ऑफ इंडिया सुपर सिनिअर सिटीझन्ससाठी (Senior citizens) 501 दिवसांच्या मुदत ठेवींसाठी 7.80 टक्के उच्च असा व्याज दर ऑफर करत आहे.
Source: moneycontrol.com