नव्या जनरेशनची X1 ही एसयूव्ही मोटार बीएमडब्ल्यूकडून पुढल्या महिन्यात लॉंच करण्यात येणार आहे. BMW X1 2023 साठी कंपनीकडून आगाऊ नोंदणी सुरु झाली आहे.
BMW X1 या कारची ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. डिझाईनचा विचार केला तर कंपनीने BMW X1 आणखी स्पोर्टी लूक दिला आहे. या श्रेणीतील आधीच्या मॉडेल्सपेक्षा ही कार आणखी आकर्षक आणि स्पोर्टी दिसेल, असा दावा कंपनीने केला आहे. एलईडी हेडलाईट्स, मल्टी स्पोक अलॉय, शार्प एलईडी टेललाईट्स आणि 10.7 इंचाचे टचस्क्रीन इन्फोटेंमेंटचा गाडीमध्ये समावेश आहे.
जानेवारी 2023 या महिन्यात ही गाडी लॉंच केली जाईल. त्याआधीच गाडीची वैशिष्ट्ये लिक झाली आहेत. इंजिनचा विचार केला तर 215 bph 2.0 लिटर पेट्रोल मोटर असून 134 bph 1.5 लिटर पेट्रोल युनिटचे इंजिन आहे. त्याशिवाय 208 bhp 2.0 लिटर ऑइन बर्नर इंजिन आणि 148 bhpचे 2.0 लिटर डिझेल इंजिन आहे. या गाडीत 7 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे.
BMW X1 या मोटारीची किंमत 45 ते 50 लाखांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मर्सिडिज बेंझ GLA,ऑडी क्यू 3, वोल्वो XC40 या मोटारींशी ही गाडी स्पर्धा करेल. BMW च्या काही निवडक डिलर्सकडे BMW X1 या मोटारीचे बुकिंग सुरु झाले आहे.