देशात आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पाला सुरूवात झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मंगळवारी (दि. 31 जानेवारी) 2022-23 आर्थिक पाहणी संसदेत सादर केली. तर उद्या बजेट 2023 (Union Budget 2023) सादर केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉईनची (Bitcoin) किंमत 4 टक्क्यांनी घसरली. तर इथेरिअम (Ethereum) 1600 डॉलरच्या खाली आली आहे.
क्रिप्टो मार्केटवर फेडरल बॅंकेच्या बैठकीचे सावट
क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉईनची किंमत गेल्या 24 तासांत 26.77 बिलिअन डॉलर इतकी होती. त्यात गेल्या 24 तासांत 4.12 टक्क्यांनी वाढ झाली होती. पण मंगळवारी बिटकॉईनची किंमत 22,788 डॉलरवर आली होती. बिटकॉईनसह, इथेरिअम आणि बऱ्याच क्रिप्टोकरन्सी गेल्या 24 तासांत घसरल्या आहेत. 2023 मधील अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बॅंकेची बैठक होणार आहे. या बैठकीत व्याजदराबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रिप्टो मार्केटने आपली रिअॅक्शन दिली. गेल्या 24 तासांत बिटकॉईनची किंमत 26.77 बिलिअन डॉलरवर होती. ती 4 टक्क्यांनी घसरून 23 हजार डॉलरच्या खाली आली आहे. तर इथेरिअम 4 टक्क्यांनी घसरूण 1600 डॉलरवर ट्रेडिंग करत होती. बिटकॉईनला 22,700 डॉलरचा सपोर्ट असून रेझिस्टन्स 23 हजार डॉलरचा असेल, अशी माहिती मुर्डेक्स सीईओ आणि सहसंस्थापक इदुल पटेल (Edul Patel, CEO & Co-Founder, Mudrex) यांनी दिली.
ट्विटर पेमेंट सिस्टिममध्ये क्रिप्टोचा समावेश
तर दुसरीकडे ट्विटरचा मालक इलॉन मस्क यांने ट्विटरच्या पेमेंट सिस्टिममध्ये क्रिप्टोचा समावेश करण्याची घोषणा केल्याने डॉजकॉईनच्या किमतीत 5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. तसेच अमेरिकेतील फेडरल बॅंकेची बुधवारी होणारी मिटिंग आणि भारताच्या केंद्रीय बजेटच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे, असे इदुल पटेल यांनी सांगितले.
क्रिप्टोमार्केटमधील टॉप क्रिप्टो कॉईन्ससुद्धा मंगळवारी घसरणीसह ट्रेडिंग करत आहेत. सोलाना क्रिप्टो टक्क्यांनी खाली आली. तर पोल्काडॉट, शिबा इनू, पॉलिगॉन आणि एक्सआरपी या क्रिप्टोकरन्सी सुद्धा घसरणीसह ट्रेडिंग करत होत्या. जागतिक क्रिप्टो मार्केटमधील भांडवल साधारण 1.04 लाख कोटी डॉलरवर होते. त्यात गेल्या 24 तासात 3.29 टक्क्यांनी घसरण झाली. coinmarketcap नुसार जगातील सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन (Bitcoin) 439.77 बिलिअन डॉलर ट्रेडिंग करत होती.