• 07 Dec, 2022 08:32

Best Time For Car Discount: ‘या’ महिन्यात मिळतं कार खरेदीवर सर्वाधिक डिस्काउंट

Best Time For Car Discount

Best Time For Car Discount: कार खरेदी करायची आहे, पण मुहूर्त अजून मिळाला नाही. वाट बघत आहात की भरपूर डिस्काउंट ऑफर येतील आणि मग कार खरेदी करणार, मग तुम्हाला सुद्धा माहित असायला हवं की सर्वाधिक डिस्काउंट कोणत्या महिन्यात मिळतं, मग वाचा

Best Time For Car Discount: कार खरेदी करायची आहे, पण मुहूर्त अजून मिळाला नाही. वाट बघत आहात की भरपूर डिस्काउंट ऑफर येतील आणि मग कार खरेदी करणार, मग तुम्ही योग्यच करत आहात. कारण कार ऑफर कधीही राहत नाही त्यासाठी विशिष्ट काळ आहे त्याबाबत माहिती पुढे दिली आहे. सणासुदीच्या काळात तर कार डिस्काउंट ऑफर्स असतातच पण त्या व्यतिरिक्त सुद्धा कार ऑफर्स असतात ते कधी जाणून घ्या. 

कोणत्या महिन्यात मिळत कार खरेदीवर सर्वाधिक डिस्काउंट

कार उत्पादक आणि डीलरशिपसाठी डिसेंबर हा सर्वात बिझी असलेला महिना आहे कारण ते नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी स्टॉक साफ करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे, भारतात कार खरेदी करण्यासाठी हा सर्वोत्तम महिना आहे कारण तुम्हाला आकर्षक सवलतीच्या ऑफर मिळू शकतात. पण डिसेंबरमध्ये कार खरेदी करण्याचे फायदे सुद्धा आहेत आणि तोटे सुद्धा, ते कोणते जाणून घ्या.

तुम्ही किती सवलतीची अपेक्षा करू शकता?

सवलतीच्या ऑफर प्रत्येकाकडून वेगळ्या असतात आणि ते कारच्या मॉडेलवर देखील अवलंबून असते.  तुम्ही काही हजार रुपयांपासून काही लाखांपर्यंत सूट मिळण्याची अपेक्षा करू शकता. जर कार बाजारात असेल तर विक्रेते जास्त आणि ग्राहक कमी असतील तर सूट वाढू शकते.

अतिरिक्त फायदे

किमतीवर सूट व्यतिरिक्त, डिसेंबरमध्ये कार खरेदी करताना तुम्हाला अतिरिक्त फायदे देखील मिळू शकतात. जसे की विनामूल्य कार विमा, विस्तारित वॉरंटी आणि सेसरीज सवलतीच्या दरात किंवा अगदी विनामूल्य सुद्धा मिळू शकतात.

वर्षाच्या शेवटी कार खरेदीचे तोटे

डिसेंबरमध्ये कारवर अनेक सवलतीच्या ऑफर येतात, परंतु त्याचे तोटेही आहेत. तुम्ही डिसेंबरमध्ये कार  खरेदी करता तेव्हा, मॉडेलचे उत्पादन वर्ष तुमची कार एक वर्ष जुनीसुद्धा असू शकते. उदाहरणार्थ, जानेवारी 2021 मध्ये तयार केली गेली असेल, तर ती एक वर्ष जुनी कार मानली जाईल आणि यामुळे कार पुन्हा विकतांना अडथळा येऊ शकतो. तसेच, अशा मॉडेल्सवर साधारणपणे सवलतीच्या ऑफर दिल्या जातात जे बाजारात इतके चालत नाही. त्यामुळे, तुम्हाला कदाचित लोकप्रिय नसलेल्या मॉडेलशी तडजोड करावी लागेल.

सेकंड हँड कार खरेदी 

 सेकंड हँड कार खरेदी करण्याचा योग्य काळ सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना आहे. या काळात सण समारंभ येतात त्यामुळे बहुतेक कार मालक नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असतात, आणि त्यांची जुनी कार विक्री असते. त्यामुळे सेकंड हँड कार साठी हा सर्वोत्तम महिना आहे.