Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनला 2 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली. याही सिझनचे होस्ट प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Bigg Boss Marathi Host Actor-Director Mahesh Manjrekar) आहे. या सीजनची थीम ‘ऑल इज वेल’ (Bigg Boss Theme All is Well) अशी आहे. सगळ्यांचा आवडता शो बिग बॉस मराठी 4 यामध्ये नवनवीन कलाकार सहभागी झाले आहेत.
Table of contents [Show]
बिग बॉस चावडी!
बिग बॉस मराठीच्या 4थ्या सिझनचा भाग प्रेक्षकांना कलर्स मराठी चॅनेलवर दररोज रात्री 10 ते 11 पर्यंत पाहायला मिळतो. त्याव्यतिरिक्त प्रेक्षकांना थेट 24x7 कॅमेरा फुटेजमध्येही अक्सेस आहे. तसेच कलर्स मराठीवर हा भाग प्रसारित होण्यापूर्वी वूट सिलेक्टवर (Voot Select) अर्धा तास अगोदर पाहता येऊ शकतो. तसेच विकेंडला हा शो बिग बॉसची चावडी या नावाखाली रात्री 9.30 वाजता पाहता येतो.
बिग बॉस मराठी 4 बघणाऱ्या अनेक प्रेक्षकांना सहजच हा प्रश्न पडत असेल की, बिग बॉस मधील कलाकार फ्री मध्येच आपले मनोरंजन करतात का? याच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही या लेखामध्ये सांगणार आहोत. बिगबॉस मराठी 4 च्या स्पर्धकांना किती मानधन मिळते आणि सर्वाधिक मानधन कोणाला मिळते? हे जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत राहा. (Bigg Boss Marathi 4 Highest Salary)
तेजस्विनी लोणारी (Tejswini Lonari)
तेजस्विनी ‘दोघात तिसरा आता सगळ विसरा’ या चित्रपटात मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) सोबत दिसली होती. आता तिने बिग बॉस मराठी 4 मध्ये एंट्री केली आहे. तिला आठवड्याचे 25 हजार रुपये मानधन मिळते.
प्रसाद जवादे (Prasad Jawade)
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘असे हे कन्यादान’ या मराठी सिरिअलमध्ये प्रसादने काम केले. प्रसादने मराठी सिरिअलबरोबरच हिंदी सिरिअलमध्ये ही काम केले. आता त्याने बिग बॉसमध्ये एंट्री केली आणि त्याला आठवड्याचे 32 हजार रुपये मानधन आहे.
किरण माने (Kiran Mane)
किरण माने हे ‘मुलगी झाली हो’ या सिरिअलमध्ये विलास पाटील या भूमिकेत होते. त्यामधून त्यांना अचानक काढून टाकण्यात आलं होतं. त्यावर सोशल मिडियात बराच चर्चा झाली होती. आता त्यांची बिगबॉस मराठी 4 मध्ये एंट्री झाली. ते बिगबॉस मराठीमधील वादगस्त स्पर्धक म्हणून चर्चेत आहे. त्यांना 28 हजार रुपये आठवड्याचे मानधन मिळते.
समृद्धी जाधव (Samruddhi Jadhav)
समृद्धीने मॉडेल म्हणून काम केले आहे. सोशल मिडियावर ती अत्यंत लोकप्रिय आहे. तिला भरतनाट्यम नृत्यांगना म्हणून ओळखलं जात. आता तिने बिगबॉस मराठीमध्ये एंट्री केली आहे. तिला 25 हजार रुपये आठवड्याचे मानधन मिळते.
अक्षय केळकर (Akshay Kelkar)
‘एक नंबर’, ‘बे दुने दहा’ आणि ‘कमला’ या सिरिअलमध्ये अक्षयने काम केले. ‘भाकरवाडी’ या सिरियलमधील भूमिकेमुळे तो अधिकच प्रसिद्ध झाला होता. आता त्याने प्रेक्षकांचे अधिक मनोरंजन करण्यासाठी बिगबॉस मराठीमध्ये एंट्री केली. त्याला 33 हजार रुपये मानधन मिळते.
अपूर्वा नेमाळेकर (Apurva Nemalekar)
अपूर्वा बिग बॉस मराठी 4 ची स्पर्धक असण्याआधी ‘रात्रीस खेळ चाले’ या सिरियलमध्ये काम करीत होती. तिला शेवंताच्या भूमिकेसाठी विशेष ओळखले जाते. तिला बिग बॉस मराठी 4 मध्ये सर्वाधिक मानधन दिले जाते. 38 हजार रुपये मानधन तिला दर आठवड्याला मिळते.
यशश्री मसुरकर (Yashasrhi Masurkar)
अभिनेत्री यशश्री मसुरकर हिने ‘रंग बदलती ओढणी’ या सिरियलमध्ये खलनायिकेची भूमिका केली होती. त्यामुळे ती अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. त्यासोबत तिने ‘लाल इश्क’, ‘कबाड’ या चित्रपटांमध्येही काम केले. सध्या ती बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून आली आहे. तिला 28 हजार रुपये आठवड्याचे मानधन मिळते.
रुचिरा जाधव (Ruchira Jadhav)
ही बिग बॉस मराठी 4 ची स्पर्धक आधी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या सिरियलमधील माया म्हणून प्रसिद्ध आहे. सोशल मिडियावर ती चांगलीच चर्चेत असते. आता तिने बिगबॉस मराठी 4 मध्ये एंट्री केली आहे. तिला आठवड्याचे 37 हजार रुपये मानधन मिळते.
बिग बॉस मराठी 4 मध्ये सहभागी झालेल्या इतर स्पर्धकांना 25 हजार व किंवा त्यापेक्षा कमी मानधन दिले जाते. यामध्ये अमृता घोंगडे, निखिल राजशिर्के, योगेश जाधव, अमृता देशमुख, विकास सावंत, त्रिशूल मराठे आणि रोहित शिंदे हे स्पर्धक आहेत.