Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 Updates: मत्स्य व्यवसायकांसाठी मोठी बातमी, शासन देणार तब्बल 6 हजार कोटी

Big News for Fish Farmers

Budget 2023: अर्थसंकल्प 2023-24 नुकताच संसदेत सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मत्स्त्यपालकांना मोठा दिलासा दिला आहे. या व्यवसायासाठी त्यांनी तब्बल 6 हजार कोटींची घोषणा केली आहे.

Big News for Fish Farmers: यंदाचा अर्थसंकल्प हा मस्त्यव्यवसायाकांसाठी आनंद देणारा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मस्त्य व्यवसायासाठी 6 हजार कोटींची घोषणा केली आहे. या व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मस्त्य व्यवसायासाठी 6 हजार कोटी (6 Thousand Crores for Fisheries)

अर्थसंकल्प 2023-24 नुसार मस्त्य व्यवसायासाठी 6 हजार कोटींची घोषणा करित असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या व्यवसायाला चालना मिळावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णयाने मच्छीमार व्यवसायिकांना आर्थिक लाभ मिळेल व त्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. 

सरकार ही देते कर्ज (Government gives Loans)

मस्त्यपालनाचा व्यवसाय ग्रामीण भागात मोठया प्रमाणात केला जातो. या व्यवसायाचा अधिक फायदा होत असल्याने, ग्रामीण भागातील लोकदेखील या व्यवसायाकडे आकर्षित झाले आहे. नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या प्रकल्प अहवालानुसार 20 हजार क्षमतेची टाकी किंवा तलाव तयार करण्यासाठी काही रक्कम देण्यात येते. जसे की, या प्रकल्पासाठी 20 लाख रूपये खर्च आला असेल, तर शासन 60 टक्के रक्कम देते. तसेच या व्यवसायासाठी शासन कर्जदेखील देते.

मागील अर्थसंकल्पात काय दिले?(What was given in the Previous Budget)

मागील अर्थसंकल्पात पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेसाठी 1210 कोटी रुपयांची तरतूद केली होती. तर मत्स्यव्यवसाय व मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधीसाठी 10 कोटी रूपये देण्यात आले होते. त्यानंतर आताच्या म्हणजे 2023 च्या अर्थसंकल्पात 6 हजार कोटींची केलेली ही घोषणा मस्त्य व्यवसायकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

काय आहे मत्स्य संपदा योजना?(What is Matsya Sampada Yojana)

शेतकऱ्यांना मस्त्य व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्यासाठी 2020 मध्ये मत्स्य संपदा योजना सुरू करण्यात आली होती. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज आणि मत्स्यपालनाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते.