Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Big Boy Toyz : महागड्या लक्झरी कार्सचे स्वप्नं पूर्ण करणारी ‘बिग बॉय टॉईज!’

Big Boy Toyz Used luxury car dealer

Big Boy Toyz : बिग बॉय टॉईज सेकंड हॅन्ड कार्ससोबतच विन्टेज कार्ससुद्धा विकते आणि खरेदी (Used & Vintage Cars) करते. यासोबतच आता कंपनीने नवीन कार्सची विक्रीसुद्धा सुरू केली आहे.

लहानपणी कधी ना कधीतरी लॅम्बोर्गिनी किंवा फरारीचे (Lamborghini and Ferrari) स्वप्नं आपण सर्वांनीच पहिले आहे. परंतु मोठे झालो की समजतं लहानपणीचे ते स्वप्नं किती महाग होते. त्यामुळे आपण ते स्वप्नं अर्धवट सोडून देतो. पण खरंच लॅम्बोर्गिनी किंवा फरारी गाडी कमी किमतीमध्ये मिळाली तर तुम्ही तुमचे अधुरे स्वप्नं पूर्ण कराल का? बिग बॉय टॉईज (Big Boy Toyz) ही कंपनी तुमचे अधुरे स्वप्नं पूर्ण करण्याची संधी घेऊन आली आहे. Big Boy Toyz ही कंपनी सेकंड हॅन्ड लक्झरी कार्स विकते. सेकंड हॅन्ड लक्झरी कार्स विकण्याच्या या युनिक आयडियामुळे बिग बॉय टॉईज ही कंपनी आज भारतातील सर्वांत मोठी कंपनी बनली आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे बिग बॉय टॉईज? आणि ती युनिक का ठरली आहे? 

बिग बॉय टॉईज कंपनी कोणाची आहे? (Who owns Big Boy Toyz Company?)

बिग बॉय टॉईज या कंपनीची सुरुवात 2009 रोजी जतिन अहुजा (Jatin Ahuja) यांनी फक्त 70 हजार रुपयांपासून केली होती. गुरुग्राममध्ये त्यांनी त्यांचे पहिले शोरूम सुरू केले होते. जे त्यांनी मुंबई आणि हेंद्राबादमध्येही एक्सपांड केले आहे. 70 हजार रुपये भांडवलाने सुरु केलेल्या या कंपनीने त्यांच्या पहिल्याच महिन्यात 6 कोटी रुपयांचा टर्नओव्हर क्रॉस केला होता. सध्या अनेक मोठमोठे सेलिब्रिटीज बिग बॉय टॉईजमधून लक्झरी कार्स खरेदी करत आहेत.  बिग बॉय टॉईजने 2017 मध्ये लक्झरी कार्स ऑनलाईन विकण्यास सुरुवात केली. भारतात ऑनलाईन कार विकणारी ही पहिली कंपनी मानली जाते. त्यांनतर कंपनीने 2019 पासून लक्झरी बाईकस् विकण्यास सुरुवात केली.

बिग बॉय टॉईजचा ग्राहक कोण? (Who is the customer of Big Boy Toyz?)

सेकंड हॅन्ड कार (Used Car) म्हटले की बरेचजण नाकं मुरडतात. पण ज्यांना नवीन कार घेणं परवडत नाही आणि त्यांना सेकंड हॅन्ड गाडी चालवण्यात वाईट काहीच वाटत नाही, असे लोक बिग बॉय टॉईजचे ग्राहक आहेत. पण या सेकंड हॅन्ड कार्स साध्यासुध्या कार नसून त्या लक्झरी कार्स आहेत. ज्या वापरणे हे सेलिब्रिटीज आणि मोठमोठ्या लोकांचे स्वप्नं असते. अशाच ग्राहकांना बिग बॉय टॉईज ग्राहक म्हणून टार्गेट करते. त्यांच्या प्राईज रेंज मध्ये अशा लक्झरी कार्स अफॉरडेबल होऊ शकतील हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.


बिग बॉय टॉईज कार्सच्या कोणकोणत्या सेवा पुरवते? (Services by Big Boy Toyz?)

बिग बॉय टॉईज सेकंड हॅन्ड कार्ससोबतच विन्टेज कार्ससुद्धा विकते आणि खरेदी (Used & Vintage Cars) करते. यासोबतच आता कंपनीने नवीन कार्सची विक्रीसुद्धा सुरू केली आहे.

सेकंड हॅन्ड कार (Used Cars)

सेकंड हॅण्ड म्हणजे युज कार्समध्ये कंपनीकडे 1200 हून अधिक पर्याय उपलब्ध आहेत. यात मर्सिडिज (Mercedes), ऑडी (Audi), बीएमडब्ल्यू (BMW) या कार्ससोबतच लेक्सस (Lexus), मिनी कूपर (Mini Cooper), व्हॉल्वो (Volvo), बेन्टली (Bentley), पोर्शे (Porsche), मासेराती घिबली (Maserati Ghibli)  अशा कार्सचे कलेक्शन आहे.

लक्झरी कार विकत घेणे  (Buy Luxury Car)

याशिवाय तुम्हाला एखादी तुम्ही वापरलेली लक्झरी कार विकायची असेल तर त्याची सोय सुद्धा बिग बॉय टॉईजकडे आहे. अवघ्या अर्ध्या तासात कंपनी तुमची डील पूर्ण करू शकते, असा कंपनीचा दावा आहे.


व्हिनटेज कार (Vintage Car)

बिग बॉय टॉईजकडे विन्टेज कार्सचे सुद्धा कलेक्शन आहे. इथे तुम्ही तुमच्या पसंतीच्या विन्टेज कार्ससाठी बोली लावू शकता. अर्थात यासाठी तुम्हाला रितसर नोंदणी करणे गरजेचे आहे. 

नवीन कार (New Cars)

बिग बॉय टॉईजने ग्राहकांची वाढती मागणी पाहता नवीन कार्स सेल करण्यास सुरूवात केली आहे. बिग बॉय टॉईजच्या कलेक्शनमध्ये मॅकलॅरेन (Mclaren), अस्टॉन मार्टिन (Aston Martin), बुगती (Bugatti), ऑडी (Audi), बीएमडब्ल्यू (BMW), मर्सिडिझ बेन्झ (Mercedes Benz), जॅग्वार (Jaguar), लॅण्ड रोव्हर (Land Rover), पोर्शे (Porsche), लॅम्बोरगिन्ही (Lamborghini) अशा गाड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.