Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Plan to Buy Used Car: 'या' गोष्टी लक्षात घ्या, Used Car खरेदी करणे सोपे जाईल

Used Car Market in India, Used Car, Automobile Industry

Plan to Buy Used Card: नवी कोरी कार घेण्याअगोदर सेकंड हॅण्ड कार घेण्याकडे नव्या ग्राहकांचा कल असतो. तुम्ही कार डिलरकडून किंवा तुमच्या परिचयातील कोणत्याही व्यक्तीकडून सेकंड हॅण्ड कार खरेदी करु शकता. मात्र ती खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

नवी कोरी असो किंवा सेकंड हॅण्ड, कार खरेदी करताना आपल्याला बरेचसे प्रश्न पडतात. याची सुरुवात होते ते गाडीची पार्किंग कुठे करायची या मुद्द्यापासून ते बजेटपर्यंत. सेकंड हॅण्ड कार म्हणजेच Used Car  खरेदी करण्याचा ट्रेंड मागील काही वर्षांत वाढला आहे. भारतात युज्ड कारचे मोठं मार्केट नावारुपाला आले आहे. नवी कोरी कार घेण्याअगोदर सेकंड हॅण्ड कार घेण्याकडे नव्या ग्राहकांचा कल असतो. तुम्ही कार डिलरकडून किंवा तुमच्या परिचयातील कोणत्याही व्यक्तीकडून सेकंड हॅण्ड कार खरेदी करु शकता. मात्र ती खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

गाडीची कागदपत्रे तपासून पाहा ( Properly Check Document's)

कार खरेदी करण्यापूर्वी तुम्ही सर्वप्रथम कोणत्या कंपनीची कार खरेदी करणार आहोत ते आधी निश्चित करा. हल्ली काही संकेतस्थळांवर जुन्या वापरलेल्या मोटारींची विक्री होते. पण अशाप्रकारे गाडी विकत घेताना खूप काळजी घ्यावी लागते. जर ऑनलाईन गाडी घेण्याचा तुम्हाला अनुभव नसेल तर तुम्ही तुमच्या परिचयातील व्यक्तीकडून सेकंड हॅण्ड वाहन खरेदी करावे. असे केल्याने व्यवहार सुरळीत होऊन तुमची फसवणूक सुद्धा होत नाही. यानंतर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गाडीची कागदपत्रे तपासून घेणे. सेकंड हॅण्ड गाडी विकत घेण्यापूर्वी गाडीशी संबधित विम्याची कागदपत्रे तपासून घ्या. यामुळे यापूर्वी गाडीचा कोणता अपघात झाला आहे की नाही? यापूर्वी कोणत्या कारणांसाठी विम्यासाठी दावा करण्यात आला आहे याची माहिती मिळते. सेकंड हॅण्ड गाडी घेताना त्या गाडीच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जुन्या मालकाच्या जागी आपलं नाव नोंदवणं गरजेचं आहे. जर पूर्वी गाडीचा इन्शुरन्स केलेला नसेल तर तातडीने इन्शुरन्ससाठी नोंदणी करा. त्यानंतर गाडीचा इंजिन क्रमांक, नोंदणी क्रमांक, चेसिस नंबर हे सुद्धा तपासून घ्या. शक्यतो सेकंड हॅण्ड गाडीचा नवीन विमा काढणे उत्तम ठरते. आधीच्या मालकाने गाडीचे पूर्ण हफ्ते भरले आहेत की नाही याची माहिती करून घ्या.

या गोष्टींना महत्व द्या ( Check Spare Part's of Used Car)

सेकंड हॅण्ड गाडीचे ऑइल, इंधन, एअर ट्रान्समिशन शक्यतो बदलून टाका. गाडीमधील या फिल्टर्सची नियमित स्वच्छता होणे गरजेचे आहे. तसेच गाडीची सर्व चाकं तपासून पाहा. त्यामुळे गाडीला नवीन टायर तर लावले नाहीत ना हे तुमच्या लक्षात येईल. सेकंड हॅण्ड गाडी असल्यामुळे गाडीचा बोनेट, रंग यांची तपासणी करणे गरजेचे आहे. यामुळे बोनेटला गंज तर चढला नाही ना? गाडीचा रंग तर बदलला नाही ना? हे कळते. सेकंड हॅण्ड गाडीच्या हेड लाईट, इंडिकेटर्स, एसी, टेल लाईट या छोट्या छोट्या गोष्टीही तपासून घ्याव्यात. त्यामुळे पुढे होणारा खर्च टळतो. गाडीचे पीयुसी प्रमाणपत्र घ्या. ज्यामुळे तुम्हाला गाडीची पूर्वी कितीवेळा सर्विसिंग झाली, गाडीत कोणता बिघाड झाला होता का? याबाबत माहिती मिळते.

गाडीची किंमत मोजताना याकडे लक्ष द्या (Pay According to Condition of Car)

सेकंड गाडीच्या वरील बाबींची खात्री झाल्यावर त्याच्या किंमतीकडे वळा. जर एखाद्या डिलरकडून तुम्ही सेकंड हॅण्ड कार खरेदी करत असाल तर त्यासाठी काही सवलत उपलब्ध आहे त्याची माहिती मिळवा. कमी किंमतीच्या गाडींच्या बाबतीत पुन्हा विचार करा. सेकंड हॅण्ड गाडीबाबत शंका असल्यास व्यवहार करू नका. गाडीची नोंदणी कोणत्या वर्षातील आहे ते पहा. त्यामुळे तुम्हाला गाडीची योग्य किंमत स्पष्ट होईल.