• 04 Oct, 2023 13:13

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Big Billion Day Sale 2022 : Flipkart Plus Membersना एक दिवस अगोदर मिळणार संधी!

Big Billion Day Sale 2022 : Flipkart Plus Membersना एक दिवस अगोदर मिळणार संधी!

Big Billion Day Sale 2022 : Flipkartचा वर्षातील सर्वांत मोठा सेल Big Billion Day Sale शुक्रवार (दि. 23 सप्टेंबर)पासून सुरू होतोय. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तुंबरोबरच घरातील नेहमीच्या वापरातील वस्तूंवर भरघोस सवलत मिळणार आहे.

Big Billion Day Sale 2022 : Flipkartने वर्षातील सर्वांत मोठ्या अशा Big Billion Days 2022 सेलमधून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या वस्तुंच्या खरेदीवर भरघोस सवलती मिळणार आहेत. यासाठी फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सुविधा आणल्या आहेत. फ्लिपकार्टने यामध्ये फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी (Flipkart Plus Members) एक दिवस अगोदर म्हणजे 22 सप्टेंबरपासून शॉपिंग करण्याचा लाभ (Flipkart Plus Member Offers) मिळणार आहे. 


Flipkartचा Big Billion Day Sale 2022 हा 23 सप्टेंबरला सुरू होणार असून 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी बिग बिलिअन डे सेल एक दिवस अगोदर म्हणजे 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. भारतातील सर्वांत मोठी E-Commerce कंपनी बिग बिलिअन सेलमधून 90 प्रकारच्या ब्रॅण्डमधून 130 स्पेशल प्रॉडक्ट्स घेऊन येणार आहे. यात फॅशनेबल कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्मार्ट मोबाईल फोन्स, घरगुती वापरातील प्रोडक्ट्सचा समावेश असणार आहे. या सर्व वस्तुंचा लाभ प्लस मेंबर्सना (Plus Membership in Flipkart) एक दिवस अगोदर घेता येणार आहे. या सेलसाठी फ्लिपकार्टने ICICI Bank आणि Axis Bank यांच्याशी भागीदारी केली आहे. या दोन्ही बॅंकांच्या कार्डवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के इन्स्टंट सवलत मिळणार आहे. 

Flipkart Plus Membership काय आहे?

फ्लिपकार्टने 2018 मध्ये प्लस मेंबरशीप (Big Billion Day for Plus Members) लॉन्च केली. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सशीप असणाऱ्या ग्राहकांना जलद सेवा, इतरांपेक्षा एक दिवस अगोदर खरेदी करण्याची संधी आणि बऱ्याच प्रोडक्टसवर फ्री डिलीव्हरी मिळते. आणि सर्वांत म्हत्त्वाचं म्हणजे यासाठी अधिकचे पैसे खर्च करावे लागत नाहीत. ही सुविधा ग्राहकांना कॉईन्सवर मिळते.

फ्लिपकार्ट प्लस कॉईन्स कसे मिळवायचे? how to get plus Coins in flipkart?

फ्लिपकार्ट आपल्या साईटवर खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दोन सुपर कॉईन्स; तर प्लस मेंबर्सना 4 सुपर कॉईन्स देते. फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक 100 रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना हे कॉईन्स दिले जातात. फ्लिपकार्ट मेंबर्स एका ऑर्डरमागे 100 सुपर कॉईन्स मिळवू शकतात. तर नॉन-प्लस मेंबर्स प्रत्येक ऑर्डरवर 50 कॉईन्स मिळवू शकतात. तुमच्या खात्यात आवश्यक सुपर कॉईन्स जमा झाल्यानंतर तुम्हाला फ्लिपकार्ट प्लस मेंबरशीप पेजवरील ‘Now Join’ बटणावर क्लिक करून, तुम्ही तुमची फ्लिपकार्ट प्लस मेंबरशीप Activate करू शकता.

Benefits for PLUS MEMBER's
Image Source : Flipkart.com

विद्यार्थ्यांसाठी Super Coin Free!

फ्लिपकार्ट प्लस सब्स्क्रिप्शन ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: फ्री आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या फ्लिपकार्ट खात्यातून लॉगिन करावे लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पुरावा म्हणून शाळा/कॉलेज/इन्स्टिट्यूटचे आयडी सादर करावे लागणार आहे.

फ्लिपकार्ट प्लस सुपर कॉईन्सची व्हॅलिडिटी किती?

फ्लिपकार्ट प्लस मेंबर्स प्रत्येक ऑर्डरवर 100 तर नॉन-प्लस मेंबर्स 50 सुपर कॉईन्स मिळवू शकतात. हे कॉईन्स खातेदाराच्या खात्यात जमा झाल्यानंतर ते एक वर्षापर्यंत Valid राहू शकतात.