5G Smart Phones: Lava, Poco, Redmi सारख्या ब्रँडने बाजारात सर्व स्वस्त किंमतीत 5 जी स्मार्टफोन आणले आहेत. या फोनला तुम्ही 15 हजार रुपयांपेक्षा ही कमी किंमतीत खरेदी करू शकता. एवढेच नाही, तर तुम्ही ऑफर्समध्येसुद्धा हे स्मार्ट फोन ऑनलाइन खरेदी करू शकता. चला, तर मग या 5G स्मार्टफोनची नावे, फीचर्स व किंमत जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
लावा ब्लेझ 5 जी (Lava Blaze 5G)
Lava Blaze 5G या स्मार्ट फोनमध्ये 4 जीबी रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. 6.5 इंचचा एचडी प्लस डिस्प्ले असून 5000mAh ची बॅटरी दिली आहे. या स्मार्ट फोनची किंमत साधारण 10 हजार 999 रुपये आहे.

रेडमी नोट 10टी 5जी (Redmi Note 10T 5G)
रेडमीच्या या फोनमध्ये 4 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. 6.56 इंचचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असून 5000mAh ची बॅटरी आहे. सोबतच 48 मेगापिक्सलचा प्रायमरी, 2 मेगापिक्सलचा मायक्रो, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. हँडसेटमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्ट फोनची किंमत 12 हजार 999 रुपये आहे.

मॅपलिन एस 10 प्लस (Maplin S10 Plus)
या स्मार्टफोनचा फुल एचडी प्लस डिस्प्ले 5.99 इंच आहे. यामध्ये 4 जीबी रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज असून, 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियरवर 21 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सोबतची 5000mAh ची बॅटरी आहे. या स्मार्टफोनची किंमत 9 हजार 499 रुपये आहे.

पोको एम4 5जी (POCO M4 5G)
या स्मार्ट फोनचा 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. यामध्ये 4 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. याची 5000mAh ची बॅटरी असून, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी व 2 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील आहे. हा स्मार्टफोन 10 हजार 999 रुपयात मिळेल.
