Bernard Arnault : जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून बर्नार्ड आरनॉल्ट यांची ओळख आहे. आरनॉल्ट हे फ्रान्स येथील असून त्यांनी फॅशन क्षेत्रामध्ये मोठा व्यवसाय उभा केला आहे. लुई व्हिटो, गेवेंची, स्टेला मॅकार्टी असे जगप्रसिद्ध ब्रँड्स बर्नार्ड आरनॉल्ट यांनी निर्माण केले आहेत. 2022 सालापासून फोर्ब्स व ब्लुमबर्गच्या श्रीमंत व्यक्तीच्या क्रमवारीत आरनॉल्ट यांनी आपलं स्थान अबाधित ठेवलं आहे.
अतिशय साधी राहणीमान असलेले बर्नार्ड आरनॉल्ट आता आपला उत्तराधिकारी नेमण्याच्या तयारीत आहेत. याचा अर्थ ते लवकरच निवृत्ती घेणार असं नाही. मात्र, आपण क्रियाशील असेपर्यंत आपल्या मुलांना कंपनीची संपूर्ण जबाबदारी घेण्यासाठी, त्यादिशेने घडविण्याची तयारी आरनॉल्ट यांनी सुरू केली आहे.
LVMH made Bernard Arnault the world’s richest person. He is schooling his five children to take over the $480 billion empire. https://t.co/FTOGuLGhOe
— The Wall Street Journal (@WSJ) April 19, 2023
बर्नार्ड आरनॉल्ट यांची संपत्ती
आजघडीला बर्नार्ड आरनॉल्ट यांचे संपत्ती मूल्य 24,320 कोटी अमेरिकन डॉलर आहे. 1989 मध्ये आरनॉल्ट यांनी LVMH कंपनीच्या माध्यमातून कंट्रोलिंग स्टेक घेतले आहेत. या कंपनीमध्ये लुई व्हिटॉन, बल्गेरी, टिफनी, सेफोरा, टॅग हियूर आणि डॉम पेरिगोन शॅम्पेन या सर्व ब्रँन्डचा समावेश आहे.
उत्तराधिकाऱ्यांची तयारी
बर्नार्ड आरनॉल्ट यांनी आपल्या पश्चात कंपनीची सुत्रे कोणत्या मुलाच्या हाती द्यावेत यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यासाठी आरनॉल्ट यांनी नामी शक्कल लढवली आहे. आरनॉल्ट यांना पाच मुलं आहेत. सर्वात मोठी मुलगी डेल्फाईन त्यानंतर चार मुलं अँटोन, अँलेक्झांडर, फ्रेडरिक आणि जीन. हे पाचही मुलं आज आरनॉल्ट यांनी उभ्या केलेल्या कंपनीच्या वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत.
तर आपल्या पश्चात कंपनी कोणी सांभाळावी, तो व्यक्ती कसा असावा यासाठी आरनॉल्ट हे आपल्या मुलांकडून तयारी करून घेत आहेत. आरनॉल्ट हे दर महिन्याला आपल्या पाचही मुलांसोबत लुई व्हिटो या LVMH कंपनीच्या मुख्यालयातील खासगी डायनिंग रूममध्ये दुपारी जेवण आयोजित करतात. यासाठी ते बरोबर 90 मिनीटं राखून ठेवतात. या जेवणाच्या वेळी ते व्यवसायाच्या वृध्दी संबंधित आपले प्रश्न मुलांसमोर मांडतात. यामध्ये व्यवसायाची भरभराट कशी करता येईल, अन्य उत्पादने व ब्रँन्डच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी, बाजारातील आव्हाने असे अनेक नानाविध प्रश्न मुलांसमोर मांडतात. प्रत्येक प्रश्नांवर मुलांची मते वैयक्तिक रित्या ऐकुन घेतात. या मतांवरून आपल्या प्रत्येक मुलाचा दृष्टिकोन जाणून घेतात व त्यांना मार्गदर्शन करतात.
आरनॉल्ट यांची मुलगी डेल्फीन ही ख्रिश्चन दिओर या ब्रँडची प्रमुख आहे. मुलगा अँटोन हा LVMH कंपनीचे व्यवहार सांभाळतो. फेडरिक हा टॅग ह्युयरचे सीईओ आहेत. अँलेक्झांडर हे टिफीनी ब्रँडचे एक्झुक्युटिव्ह आहेत. तर सर्वात शेवटचा मुलगा जीन हा लुई व्हिटॉन ब्रँडचे मार्केटिंग हेड आणि प्रॉडक्ट डेव्हल्पमेंट म्हणून कार्यरत आहेत.