लॉटरीमध्ये अनेक जण आपलं नशीब आजमावतात. पण, सगळ्याचं नशीब हे अरूणकुमार सारखं नसतं, असं म्हणावं लागेल. कारण, मूळच्या बंगळुरीच्या या अबुधाबीवासीयाने अलीकडेच UAE मधली सगळ्यात मोठी लॉटरी जिंकली आहे. रातोरात अरूणकुमार वाटक्के कोरोथ हे भारतीय रुपयांमध्ये 44 कोटींचे मालक झाले आहेत.
सुरुवातीला वाटलं, कुणीतरी मस्करी करतंय!
अरूणकुमार कोरोथ यांनी अबु धाबीतल्या द बिग तिकीट राफेल या लॉटरी संबंधित कार्यक्रमाविषयी त्यांच्या मित्रांकडून ऐकलं होतं. त्यानंतर त्याने एक-दोन वेळा ऑनलाईन तिकीट सुद्धा काढलं. मात्र, त्यामध्ये त्याला अपयश आलं. त्यानंतर 22 मार्चला त्याने तिसऱ्यांदा ऑनलाइन तिकीट काढलं आणि त्याचं नशीबच बदललं. अरूणकुमारचं नशिब बदलणाऱ्या या तिकीटांचा नंबर होता 261031. मार्च महिन्याच्या लॉटरी सोडतीमध्ये अरुणकुमारला पहिल्या क्रमांकांची लॉटरी लागली. शोच्या होस्टने त्याला फोन करुन ही आनंदाची बातमी दिली. पण अरूणकुमारला आपली मस्करी करतंय असं वाटलं. त्याने तो फोन कट करुन ब्लॉक केला. शो होस्टने त्याला दुसऱ्या नंबरवरून फोन करुन पुन्हा सविस्तर माहिती दिली. तेव्हा त्याला खात्री पटली. पण आपण 20 मिलीयन दरहाम म्हणजे 44 कोटीची लॉटरी जिंकलोय याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.
तेथील स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरुणकुमार यांनी हा प्रसंग सांगितला. या रकमेतून त्याचं व्यवसाय सुरू करण्याच स्वप्न पूर्ण करणार असल्याच त्यांने सांगितलं.
द बिग तिकीट राफेल
द बिग तिकीट राफेल हा संयुक्त अरब आमिरातीमधला सर्वात मोठा लॉटरीचा कार्यक्रम आहे. दर महिन्याला या कार्यक्रमामधून लॉटरी काढली जाते. पहिली लॉटरी ही 15 ते 20 मिलीयन दिरामची असते. भारतीय चलनानुसार 40 ते 44 कोटी किंमतीची ही लॉटरी असते. या लॉटरीची सोडत ही ऑनलाईन पद्दतीने निघत असते.
लॉटरीचे दुसरे विजेते सुरेथ माथम्
मार्च महिन्याच्या लॉटर फेरीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची लॉटरी सुध्दा भारतीय नागरिकाला लागली आहे. सुरेश माथम् असं त्याचे नाव असून तो सुध्दा बहरीन येथे नोकरी निमित्ताने वास्तव्याला आहे. सुरेश याला 1 लाख दिराम म्हणजे भारतीय चलनानुसार 22 लाखाची लॉटरी लागली आहे.