Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Bond विक्रीत बेळगावचा टपाल विभाग अव्वल!

sovereign gold bond scheme

गोल्ड बॉण्ड योजनेचा 2022-23 मधील (Sovereign gold bond scheme 2022-23 next date) खरेदीचा दुसरा टप्पा 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान खुला होणार आहे.

सर्वसामान्यांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध मिळावी या हेतूने केंद्र सरकारने 20 ते 24 जून या दरम्यान सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme 2022-23) खुली केली होती. या सरकारी सोनं खरेदी योजनेत बेळगावमधील पोस्ट विभाग (Gold Bond India Post) देशात अव्वल ठरला आहे. बेळगावमधील या पोस्ट ऑफिसने 3.53 कोटी रूपयांचे सोनं विकून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

सुरक्षितता आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यातील गुंतवणुकीला नेहमीच पसंती दिली जाते. त्यात सरकारने या सोनं खरेदी योजनेत 5091 रुपये प्रति ग्राम (Sovereign gold bond scheme 2022-23 price) एवढी किंमत निश्चित केली होती. बेळगाव पोस्ट सर्कलमध्ये बेळगावसह, खानापूर, बैलहोंगल, कित्तूर आणि रामदूर्ग या तालुक्यांचा समावेश होतो. बेळगाव पोस्ट सर्कलने एकूण 6,941 ग्रॅम गोल्ड बॉण्डची विक्री केली. तामिळनाडूमधील तांबारम सर्कलने 3,600 ग्रॅम तर नाम्मकल सर्कलने 2,550 ग्रॅम बॉण्डची विक्री केली.

बेळगाव पोस्ट ऑफिसची 2 किलो सोन्याची विक्री!

सोव्हर्जिन गोल्ड बॉण्ड योजनेत एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात कमीत-कमी 1 ग्राम ते जास्तीत जास्त 4 किलो पर्यंत सोन्याचे बॉण्ड खरेदी करू शकते. याशिवाय ट्रस्ट किंवा तत्सम संस्था 20 किलोपर्यंतचे बॉण्ड खरेदी करू शकत होते. बेळगाव मेन पोस्ट ऑफिसमधून अंदाजित 2 किलो सोन्याच्या किमतीच्या बॉण्डची विक्री झाली.

गोल्ड बॉण्ड योजना काय आहे?

गोल्ड बाँड योजना ही गोल्ड कमॉडिटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. भारत सरकारने 5 नोव्हेंबर 2015 पासून सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme) सुरु केली होती. आतापर्यंत आरबीआयने गोल्ड बॉण्ड्सचे आठ टप्पे जारी केले आहेत. या गोल्ड बॉण्ड्सची किंमत 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीवर आधारित असते. नॅशनल स्टॉक एक्सचेंज नुसार गोल्ड बॉन्ड ची किंमत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे (IBJA) सरकार सोन्याचे दर ठरवते. याशिवाय, या योजनेचा एक फायदा असा आहे की, यामध्ये सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या रकमेवर वार्षिक 2.50 टक्के निश्चित व्याजदर दिला जातो.

गोल्ड बॉण्ड खरेदीचा दुसरा टप्पा ऑगस्टमध्ये

गोल्ड बॉण्ड योजनेचा 2022-23 मधील (Sovereign gold bond scheme 2022-23 next date) खरेदीचा दुसरा टप्पा 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान खुला होणार आहे. 2021-22 मध्ये एकूण 12,991 कोटी रुपयांच्या बॉण्डची विक्री 10 टप्प्यांमध्ये करण्यात आली होती.