Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wedding Loan: वेडिंग लोन घेण्यापूर्वी 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात घ्या

Wedding Loan

Wedding Loan: हल्ली लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर अनेक बँका वैयक्तिक कर्जाअंतर्गत (Personal Loan) विवाह कर्ज उपलब्ध करून देतात. ही रक्कम लग्नाशी संबंधित खर्चासाठी वापरता येते. जर तुम्हीही विवाह कर्ज (Wedding Loan) घेण्याचा विचार करत असाल, तर कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सध्या सगळीकडेच लग्नसराईची घाई पाहायला मिळत आहे. भारतात लग्नाचा सोहळा हा किमान 4 ते 5 दिवसांचा असतो. या सोहळ्यात लाखो करोडो रुपये खर्च होतात. तुम्ही स्वतः लग्न करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या मुलांची लग्न करण्याच्या विचारात असाल, तर तुम्हाला पैशांची गरज ही नक्कीच लागेल.

सध्या वैयक्तिक कर्जा (Personal Loan) अंतर्गत बँका विवाह कर्ज (Wedding Loan) उपलब्ध करून देत आहेत. ही रक्कम तुम्ही लग्नाशी संबंधित खर्च जसे की, कॅटरिंग, कपडे, दागिने, हॉल बुकिंग इ. गोष्टींसाठी वापरू शकता. लग्नानंतर हे कर्ज देण्यात आलेल्या कालावधीत हप्त्याच्या स्वरूपात फेडता येते. जर तुम्हीही लग्नासाठी विवाह कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

before-taking-a-marriage-loan-keep-these-5-things-in-mind.jpg

क्रेडिट स्कोअर (Credit score)

बँकेमध्ये विवाह कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर तपासणे (Check Credit Score) गरजेचे आहे. 750 रेटिंगपेक्षा कमी स्कोअर असणाऱ्या लोकांना बँक सहसा कर्ज उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणे अतिशय गरजेचे आहे. तुम्हाला लग्नासाठी कर्ज हवे असेल, तर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 पॉईंट्सपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

ईएमआय भरणे (EMI)

बँकेकडे विवाह कर्जाची मागणी करण्यापूर्वी आर्थिक नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे. जर तुमचे बँकेमध्ये पूर्वीपासूनच ईएमआय (EMI) चालू असतील, तर ते लवकरात लवकर भरून वेळेत कर्ज फेडा. जेणेकरून बँक तुम्हाला नवीन कर्ज उपलब्ध करून देईल. तसेच तुमच्यावर अतिरिक्त कर्जाचा ताण राहणार नाही. तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही घेतलेले कर्ज हे तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 30% हून कमी ठेवण्याचा सल्ला अनेकजण देतात.

योग्य व्याजदर निवडणे (Choosing The Right Interest Rate)

लग्नासाठी विवाह कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांचे विवाह कर्जावरील व्याजदर (Interest Rate) तपासणे गरजेचे आहे. या व्याजदराची आणि कर्ज फेडण्याच्या कालावधीची तुलना करणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्याला सर्वोत्तम व्याजदर मिळण्यासाठी मदत होईल. जी बँक दीर्घकाळासाठी कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देईल, त्या बँकेची तुम्ही निवड करू शकता.

फोरक्लोजर चार्जेस (Foreclosure Charges)

जेव्हा तुम्ही घेतलेल्या कर्जाची उर्वरित मुद्दल रक्कम एकाच वेळी भरता, त्यावेळी बँक तुमच्याकडून काही शुल्क आकारते, त्या रकमेला फोरक्लोजर चार्जेस (Foreclosure Charges) असे म्हणतात. या शुल्काबाबत माहिती करून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक बँकेचे फोरक्लोजर चार्जेस वेगेवगळे असतात. ज्यावेळी तुम्ही कर्ज क्लोज करण्याचा विचार कराल, त्यावेळी तुम्हाला त्रास होता कामा नये.

आयकर रिटर्न फाईल (File Income Tax Return)

तुम्ही तुमचा आयकर रिटर्न ( Income Tax Return) वेळेवर भरणे गरजेचे आहे. या आयकर रिटर्नवरून बँकांना कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि माहिती मिळते. ही रिटर्न फाईल पाहून बँका तुम्हाला कर्ज सहजपणे मंजूर करतील.

(Source: livemint.com )