म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढत आहे. मात्र ही निवड विचारपूर्वक करणे आवश्यक असते. Mutual Fund निवड करताना सामान्यपणे कोणत्या बाबींचा विचार केला जातो आणि आणख्या कोणत्या घटकांचा विचार केल्यावर ही निवड अजून प्रभावी ठरेलं ते जाणून घेऊया.
सामान्यपणे Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताना ठराविक 2-3 घटक विचारात घेतले जातात. यामध्ये फंडाची मागील कामगिरी, स्टार रेटिंग, NAV अशा घटकांचा समावेश करता येईल.
यापुढे जाऊन आणखीही काही रेशो बघता येतात ज्यामुळे आपली Mutual Fund निवड ही अधिक प्रभावी होऊ शकेल.
Expense Ratio - आपण ज्या फंडात पैसे गुंतवतो त्या फंडाला अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात. कर्मचाऱ्यांचे पगार,मॅनेजमेंट असे अनेक प्रकारचे खर्च असतात. आपल्याला फंड घेताना होणारा खर्च किती आहे, हे वेगवेगळ्या फंडाशी तुलना करून बघता येते.
Standard Deviation - म्युच्युअल फंडचे रिटर्न सरासरी मागील रिटर्नशी कोणत्या प्रमाणात आहेत याचं कॅल्क्युलेशन करताना स्टॅंडर्ड डेविएशन काढलं जात. स्टॅंडर्ड डेविएशन जितकं लार्ज असेल तितका नुकसान किंवा फायदा हा जास्त असेल.
SHARPE Ratio - शार्प रेशो म्युच्युअल फंडच्या रिस्क ऍडजेस्टेड परताव्याचे मापन करतो. एखाद्या फंडाने जास्त रिस्क घेऊन जास्त परतावा दिला असेल तर शार्प रेशो कमी राहील.
Treynor Ratio - हा रेशो BETA चा वापर करून सिस्टीमॅटिक रिस्क ऍडजस्ट करतो. सिस्टीमॅटिक रिस्क बाजारातील गुंतवणूकीशी संबंधित रिस्क आहे. गुंतवणूकीत विविधता आणून रिस्क कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, पूर्ण बाजाराशी संबंधित रिस्क कायम असते.
याप्रमाणे आणखीही काही रेशो बघितले जातात. BETA हा रेशो बेंचमार्क रिटर्नच्या तुलनेत Mutual Fund रिटर्नशी संबंधित असतो.Alpha हा फंडाद्वारे घेतलेल्या रिस्क ऍडजस्ट केल्यानंतर फंडाने बेंचमार्कच्या तुलनेत काय कामागिरी केली आहे, याचा अंदाज येतो. Sortno Ratio हा मार्केट फॉल असण्याशी संबंधित असतो.Turnover Ratio हा एका वर्षात झालेल्या होल्डिंगच्या रिप्लेसमेंटचे मापन करतो.
सर्वसामान्यपणे घटकाप्रमाणेचं अशा काही रेशोचा विचार देखील आपल्याला Mutual Fund ची निवड करताना करता येतो.