Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Basic Trading Strategies: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु करताय? जाणून घ्या 3 बेसिक स्ट्रॅटेजी!

Basic Trading Strategies

Basic Trading Strategies: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना सर्वप्रथम त्याची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. त्यानंतर ट्रेडिंग करताना स्ट्रॅटेजी वापरली जाते म्हणजे नेमके काय केले जाते. हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. नाहीतर सुरूवातीलाच मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

कोराना आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यादरम्यान बऱ्याच जणांनी शेअर मार्केटला (Share Market) आपलेसे करून ट्रेडिंगमध्ये आपले करिअर करण्यास सुरूवात केली. परिणामी याकाळात आणि नंतरही डी-मॅट खाते सुरू करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. तरूणाई सुद्धा शेअर मार्केटला इन्व्हेस्टमेंट आणि करिअर ऑप्शन म्हणून निवडत आहे. पण यासाठी शेअर मार्केटची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. कारण, बरेचजण ऑनलाईन यूट्यूब किंवा टेलिग्रामवर एखादी स्ट्रॅटेजी पाहून त्यातील हिरव्या रंगाला आकर्षित होऊन, हीच स्ट्रॅटेजी वापरणार, असे म्हणणे मोठी चूक ठरू शकेल.

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग (Trading) करताना सर्वप्रथम त्याची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. त्यानंतर ट्रेडिंग करताना स्ट्रॅटेजी वापरली जाते म्हणजे नेमके काय केले जाते. हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. नाहीतर सुरूवातीलाच मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. परिणामी शेअर ट्रेडिंगमधील तुमचा इंटरेस्ट कमी होऊ शकतो. त्यामुळे सुरूवातीला अशा स्ट्रॅटेजीचा वापर करणे योग्य ठरेल. ज्या समजण्यासाठी सोप्या आणि त्या वापरताना खूप नुकसानही होणार नाही. पण त्यातून आणखी काही नवीन गोष्टी शिकण्यास मदत होईल. तर अशाच बेसिक स्ट्रॅटेजीसबद्दल जाणून घेऊ.

बाय लो, सेल हाय (Buy Low, Sell High)

कोणत्याही मार्केटमधील ट्रेडिंग असो. ‘बाय लो, सेल हाय’, हा साधासोपा नियम सर्वच यशस्वी ट्रेडर्स फॉलो करतात. ट्रेडिंगच्या सुरूवातीच्या काळात जेव्हा एखाद्या शेअरची किंमत पडते तेव्हा तो विकत घ्यायचा आणि तो वर गेला की विकायचा. ही स्ट्रॅटेजी एकदम सोपी आहे. पण या स्ट्रॅटेजी वापर करताना बरेच जण एक कॉमन चूक करतात. ती म्हणजे, अनेक गुंतवणूकदारांना कमी किमतीत शेअर्स मिळतात. पण ते नंतर कोणत्या किमतीला विकायच्या, हे त्यांना समजत नाही आणि नेमकी इथेच त्यांनी फसगत होते. जास्तीचा लोभ बाळगून तो शेअर्स आणखी वाढेल याची वाट पाहिली जाते. पण अचानक एक रॅली येते आणि त्यात त्याची किंमत कोसळते. अशावेळी, “मला किती फायदा हवा आहे व मी किती तोटा सहन करू शकतो,” याची मानसिक तयारी करून त्याचा रेशो ठरवणे गरजेचे आहे. या रेशोला रिस्क-रिवॉर्ड रेशो (Risk-Reward ratio) असेही म्हटले जाते. या रेशोमुळे स्टॉकमधून बाहेर कधी पडायचे याच अंदाज येऊ शकतो.

मार्केट व्होलॅटॅलिटीचा परिणाम न होणारे स्टॉक्स निवडा!

अनेक जण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना स्वत:चा अभ्यास आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीचा वापर करतात. पण जेव्हा संपूर्ण मार्केटचं कोसळायला लागते तेव्हा सर्वांसोबत आपलेही नुकसान होते. अशावेळी मार्केटवर परिणाम करणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत; ज्या समजणे थोडे अवघड आहे. पण बरेच एक्स्पर्ट ट्रेडर्स मार्केटवर परिणाम करणाऱ्या याच गोष्टींचा फायदा घेतात आणि नफा मिळवतात. हे झाले एक्सपर्टसचे पण सर्वसामान्य किंवा नवीन ट्रेडर्सचे काय? अशा प्रश्न निर्माण होतो. तर नवीन ट्रेडर्सनी अशा परिस्थितीत असे शेअर्स निवडावेत. ज्याचा त्या त्या शेअर्सवर कोणताच परिणाम होत नाही. मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये ट्रेडिंग केल्याने मार्केटमधील अस्थिरतेकडे आपल्याला दुर्लक्ष करता येते.

लॉन्ग टर्म रिटर्न्स देणारे शेअर्स नेहमी फायदेशीर ठरू शकतात!

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारे नवीन ट्रेडर्स असो किंवा जुने प्रत्येकाला लॉन्ग टर्मचे महत्त्व आहे. लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंटचे मार्केटमध्ये वेगळेच महत्त्व आहे. मार्केटमधील सर्व स्ट्रॅटेजीसमधील एक मुख्य स्ट्रॅटेजी म्हणजे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट. आपण एखादा स्टॉक विकत घेतो आणि तो स्टॉक चांगला परफॉर्मन्स देऊ लागला की आपण तो लगेच विकण्याची घाई करतो. पण तो स्टॉक विकण्याऐवजी होल्ड केला तर भविष्यात त्यातून  मोठा फायदा मिळवण्याची शक्यता असू शकते. पण लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंटसाठी स्टॉक्सची निवड करताना संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे किंवा त्याबाबत अधिकृत वित्तीय सल्लागराची मदत घेतल्यास योग्य होईल.

तर या आहेत शेअर मार्केटमधील साध्या-सोप्या 3 स्ट्रॅटेजी. ज्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्रवासाची सुरुवात चांगली ठरू शकते. पण कोणतीही गुंतवणूक करताना त्याची संपूर्ण माहिती घेऊनच त्यात गुंतवणूक करणे, हा सर्वांत महत्त्वाचा नियम पाळणे गरजेचे आहे.