• 06 Jun, 2023 17:42

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Investment: बडोदा बीएनपी परिबाकडून व्हॅल्यू फंड गुंतणुकीसाठी खुला, जाणून घ्या सविस्तर

Mutual Fund Investment

Mutual Fund Investment: मूल्याधारित गुंतवणूक धोरणांतर्गत बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाने मुदतमुक्त समभाग योजना प्रकारात बडोदा बीएनपी परिबा व्हॅल्यू फंड हा नवीन फंड गुंतवणूकदारांसाठी बाजारात आणल्याची घोषणा केली. दीर्घकालीन गुंतवणूक कालावधीचा दृष्टीकोन बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करणे, हा या फंडाचा उद्देश आहे.

मूल्याधारित गुंतवणूक धोरणांतर्गत बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाने मुदतमुक्त समभाग योजना प्रकारात बडोदा बीएनपी परिबा व्हॅल्यू फंड हा नवीन फंड गुंतवणूकदारांसाठी बाजारात आणल्याची घोषणा केली. दीर्घकालीन गुंतवणूक कालावधीचा दृष्टीकोन बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करणे, हा या फंडाचा उद्देश आहे. नवीन फंड ऑफर 17 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाली असून 31 मे 2023 रोजी बंद होईल.

मूल्य गुंतवणुकीच्या तत्त्वांचा वापर करून निवडलेल्या कंपन्यांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली वाढ साध्य करणे, हे या फंडाचे उद्दिष्ट आहे. या फंडाचे व्यवस्थापन 21 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेले शिव चनानी  करणार  आहेत. हा फंड निफ्टी 500 इंडेक्स हा या फंडासाठी आधारभूत निर्देशांक आहे. या फंडात किमान 5000 रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. त्यापुढे 1 रुपयांच्या पटीत गुंतवणूक वाढवता येईल.

समभागांचे मूलभूत मुल्य आणि प्रचलित बाजारभाव यांच्यातील तफावतीमुळे निर्माण झालेल्या संधी हा फंड हेरणार आहे. या संधी ओळखण्यासाठी हा फंड बाजारात सवलतीच्या दरपातळीवर असणाऱ्या समभागांचा शोध घेईल, तसेच त्यांची स्वतःची ऐतिहासिक सरासरी पातळी अथवा मूलभूत मूल्यांच्या तुलनेत या पातळीचा विचार गुंतवणूकीवेळी करणार आहे.  

शेअरबाजारामध्ये विविध स्तरांवर मूल्याच्या अनेक संधी उपलब्ध होतात. हा या फंडाला विश्वास आहे आणि त्या संधी म्हणजे विस्तृत शेअरबाजार अनेकदा संकट कोसळताच अतार्किकपणे प्रतिक्रिया व्यक्त करतो. उदा. 2008 मधील जागतिक वित्तीय संकटावेळी किंवा 2020 मध्ये कोविड साथीमुळे झालेली अतिप्रचंड घसरण. अशावेळी बाजारपेठेत आकर्षक संधी उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय क्षेत्रनिहाय विशिष्ट आव्हाने, जसे की पुरवठा साखळीत आलेले अल्पकालीन व्यत्यय, नियमनातील बदल इत्यादी नानाविध क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकीसाठी मूल्य संधी प्रदान करत असतात. तिसरा मुद्दा म्हणजे तळ ते शिखर या आमच्या  संशोधन दृष्टीकोनातून कंपनीनिहाय विशिष्ट संधींचा शोध घेतला जातो. (Baroda BNP Paribas Launches Value Fund)

सदर योजना समभाग आणि समभागांशी संबंधित साधनांमध्ये (65% ते 100%), डेट आणि चलन बाजार रोख्यांमध्ये (0% ते 35%), रिटस् (REITs) आणि इनव्हीट्स (INvITs) व्दारे जारी केलेल्या युनिट्समध्ये (0% ते 10%) आणि म्युच्युअल फंड योजनांच्या युनिट्समध्ये (0 ते 10%) गुंतवणूक करेल. 

"बडोदा बीएनपी परिबा एएमसीमध्ये, सक्षम अशी गुंतवणूक संस्कृती आहे आणि तिला शिस्तबद्ध कार्यपध्दती, अनुभवी तज्ज्ञांचा चमू आणि भक्कम कार्यप्रणालीची जोड लाभलेली आहे. अंतर्गत मूल्यपातळीवर सवलतीत उपलब्ध असलेले समभाग गुंतवणूकीच्या संधीसाठी हुडकून काढणे, हे बडोदा बीएनपी परिबा व्हॅल्यू या नवीन फंडासाठी आमचे उद्दिष्ट आहे. 

या संधी समभाग, क्षेत्र आणि बाजार मूल्य यामध्ये असू शकतात. जोखीमचे उत्तमप्रकारे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी आमच्याकडे सक्षम अशी सुरक्षेची चौकट आहे. ताळेबंद, कमाई आणि मूल्यांकनामध्ये सुरक्षिततेची किनार आमच्या ‘थ्री एस चौकटीचे प्रतिनिधित्व करते," अशी टिप्पणी बडोदा बीएनपी परिबा म्युच्यूअल फंडाचे सीईओ सुरेश सोनी यांनी या नव्या फंडाच्या शुभारंभप्रसंगी केले. 

सुरक्षिततेच्या पुरेशा उपायांसह मूल्य समभागांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू इच्छिणाऱ्या आणि वाढ-उन्मुख पोर्टफोलिओमधून विविधता हवी असणाऱ्या दीर्घकालीन संयमी गुंतवणूकदारांसाठी ही नवीन योजना अतिशय समर्पक आहे. कमाईत संभाव्य वाढ तसेच फेरमूल्यांकनाचा लाभ मिळवणे हा या फंडाचा उद्देश आहे.

बडोदा बीएनपी परिबा म्युच्यूअल फंडाची वैशिष्टे

  • एनएफओ 17 मे 2023 रोजी गुंतवणूकीसाठी खुला आणि 31 मे 2023 रोजी बंद होणार
  • ही योजना मूल्य गुंतवणूक धोरणाला अनुसरून मुदतमुक्त श्रेणीतील समभाग योजना
  • बाजारनिहाय, क्षेत्रनिहाय आणि समभाग अशा स्तरांवरील संधीवर लक्ष केंद्रीत करणारा गुंतवणूक दृष्टीकोन
  • मध्यम ते दीर्घ मुदत कालावधीसाठीच्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय