Bank of Maharashtra Strike: युनायटेड फोरम ऑफ महा बॅंक युनियनकडून(United Forum of Maha Bank Unions) एका परिपत्रकाद्वारे देशव्यापी संपाचा इशारा देण्यात आला आहे. देशामधील सर्व बॅंकांकडून 30 आणि 31 जानेवारी रोजी संपाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत आज(27 जानेवारी) एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक अयशस्वी ठरल्यास बॅंक ऑफ महाराष्ट्र(Bank of Maharashtra) आजपासून(27 जानेवारी) ते 31 जानेवारीपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. सध्या बँकेच्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळेच कर्मचाऱ्यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा संप करण्यामागे कोणती कारणे आहेत चला जाणून घेऊयात.
संपूर्ण देशातल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील(Bank of Maharashtra) कर्मचारी आज एक दिवसीय संपावर जाणार आहेत. अर्थात याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. राज्यात बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण 700 शाखा कार्यरत आहेत व त्यामध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 13,000 इतकी आहे. गेल्या दहा वर्षात बँकेचा व्यवसाय अडीच पटीने वाढला असून कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने हा संप पुकारला आहे.
संपावर जाण्याचे कारण काय?(Reason for going on Strike?)
बँकेचा कारभार आणि कामकाज वाढत असताना कर्मचाऱ्यांची संख्या 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. मृत्यू, निवृत्ती, राजीनामे यासारख्या कारणामुळे रिकाम्या झालेल्या जागा देखील अजून पर्यंत भरल्या नसल्यामुळे त्यांच्या अतिरिक्त कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर येऊन पडला आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना जास्त वेळ काम करावे लागत आहे. सुट्टीच्या दिवशीही कामावर यावे लागत असून, हक्काची रजाही घेता येत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे अशक्य होत चालले आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या तब्येतीवर होत असल्याचा दावा संघटनेच्या पत्रकात करण्यात आला आहे. शिवाय अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे ग्राहकांना सेवा देताना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी वारंवार मांडूनही बँक व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्यामुळे संपाची हाक देण्यात आली आहे.
बँकेच्या व्याज दरात वाढ(Increase in bank interest rates)
बँक ऑफ महाराष्ट्रने मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ केली असून ही व्याज दरवाढ 9 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आली आहे. बँकेने सात दिवसांपासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवर 2.75 टक्के ते 5.75 टक्क्यांपर्यंत व्याज दर वाढवले आहे. 400 दिवसांसाठी असलेली मुदत ठेव योजना 'महा धनवर्षा' मध्ये 6.30 टक्के व्याज मिळत आहे. याशिवाय 7 ते 30 दिवसांच्या मुदत ठेवीवर 2.75 टक्के, 31 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3 टक्के, 46 ते 90 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3.50 टक्के व्याज दर लागू करण्यात आला आहे. 91 ते 119 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4.50 टक्के असून 120 ते 180 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4.75 टक्के आणि 181 ते 270 दिवसांसाठी 5.25 टक्के, 271 ते 299 दिवसांकरिता 5.50 टक्के व्याज दर लागू आहे. 300 दिवसांच्या एफडीसाठी 5.50 टक्के व्याज लागू केले आहे. 301 दिवस ते 364 दिवसांच्या मुदत ठेवीकरिता 5.85 टक्के व्याज दर देण्यात येत आहे. तर, 365 दिवसांच्या मुदत ठेवीसाठी 6 टक्के व्याज दर बँक देत आहे. एक वर्ष ते 399 दिवसांच्या मुदत ठेवीवर 6 टक्के आणि 400 दिवसांच्या मुदत ठेवीवर 6.30 टक्के व्याज दर ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय तीन ते पाच वर्षांसाठीच्या मुदत ठेवीवर 5.75 टक्के आणि पाच वर्षांहून अधिक काळाच्या मुदत ठेवीवर 5.75 टक्के व्याज दर लागू होत आहे.