Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank of England Hike Rates: बँक ऑफ इंग्लंडची व्याजदरात 5 टक्क्यांनी वाढ; इंग्लंडचे व्याजदर 15 वर्षांच्या उच्चांकावर

Bank of England Hike Interest Rate

Image Source : www.news.sky.com

Bank of England Hike Interest Rate: बँक ऑफ इंग्लंडच्या पतधोरण समितीची (Monetary Policy Committee-MPC) गुरूवारी (दि. 22 जून बैठक झाली. या बैठकीत घेण्यात आलेल्या मतदानात 7-12 या मत प्रवाहाने व्याजदरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली. बँक ऑफ इंग्लंडचा व्याजदर 4.5 टक्के होता. तो 5 टक्के झाला आहे.

Bank of England: वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी बँक ऑफ  इंग्लंडने व्याजदरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. बँकेने आतापर्यंत सलग 13 वेळा व्याजदरात वाढ केली.

बँक ऑफ इंग्लंडच्या पतधोरण समितीची (Monetary Policy Committee-MPC) गुरूवारी (दि. 22 जून बैठक झाली. या बैठकीत घेण्यात आलेल्या मतदानात 7-12 या मत प्रवाहाने व्याजदरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली. बँक ऑफ इंग्लंडचा व्याजदर 4.5 टक्के होता. तो 5 टक्के झाला आहे.  हा व्याजदर 2008 नंतरचा सर्वांधिक व्याजदर असल्याचे बोलले जात आहे.

इंग्लंडमधील आर्थिक स्थितीचा अभ्यास करणाऱ्या अर्थतज्ज्ञांनी व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ होईल, असे अंदाज व्यक्त केले होते. पण बँकेने मात्र 0.50 टक्क्यांची वाढ जाहीर केली. बँकेच्या या निर्णयावरून इंग्लंडमधील महागाईचा अंदाज लावला जाऊ शकतो. मे महिन्यातील तिथला महागाई दर 8.7 टक्के राहिला आहे आणि त्यात कमी होण्याची काहीच संकते दिसत नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंड महागाईचा सामना करत आहे. पण त्यात अद्याप त्यांना यश आलेले नाही. बँकेने सलग 13 वेळा व्याजदरात वाढ केली आहे. दरम्यान, बँक ऑफ इंग्लंडने असेही म्हटले आहे की, इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट नाही.

वाढती महागाई आणि जागतिक मंदीच्या वाऱ्यामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळू लागली होती. अमेरिकेमध्ये सुद्धा मागील वर्षभरात महागाईने कळस गाठला होता. तिथेही फेडरल बँकेने व्याजदरात ऐतिहासिक वाढ केली होती. भारतातही अशीच परिस्थिती होती. आरबीआयने मे, 2022 पासून सतत रेपो दरात वाढ करून जवळपास 2.50 टक्के दर वाढवला होता. तो आता सलग दोन बैठकांमधून 6.50 टक्क्यांवर स्थिरावला आहे.