• 31 Mar, 2023 09:02

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BOB Home loan: होम लोन मिळवा स्वस्तात! बँक ऑफ बडोदाकडून गृहकर्जावर ऑफर, स्पेशल व्याजदर चेक करा

BOB Home loan

तुमचं घर घेण्याचं स्वप्न आता लवकर पूर्ण होईल. बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. ही स्पेशल ऑफर फक्त मार्च एंडपर्यंत असणार आहे. गृहकर्जावरील स्पेशल व्याजदर लगेच चेक करा. फक्त 30 मिनिटांतही कर्ज मिळू शकते तेही झिरो प्रोसेसिंग फी शिवाय.

BOB Home loan: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) मागील काही महिन्यांपासून व्याजदरात सतत वाढ करण्यात येत आहे. परिणामी गृहकर्ज सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. तसेच कर्जाचे हप्ते (EMI) ही वाढत आहेत. मात्र, बँक ऑफ बडोदाने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. गृहकर्जावरील व्याजदर 40 बेसिस पॉइंटने कमी करण्यात आले आहेत. ही ऑफर फक्त 31 मार्चपर्यंत आहे. या ऑफरचा लाभ घेणाऱ्यांना स्वस्तात गृहकर्ज मिळेल.

गृहकर्ज मिळवा आकर्षक व्याजदरात (Bank of Baroda Home loan offer) 

जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने ही ऑफर आणली आहे. मागील काही दिवसांपासून व्याजदर जरी वाढत असले तरी गृहकर्जाची डिमांडही वाढत आहे. (Bank of Baroda Home loan offer) बँक ऑफ बडोदामधून ग्राहकांना आता 8.5% व्याजदराने गृहकर्ज मिळेल. 5 मार्च पासून ही ऑफर लागू झाली असून 31 मार्चपर्यंतच ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. इतर बँकांच्या तुलनेत BOB ची ही गृहकर्ज ऑफर सर्वात चांगली असल्याचा दावा बँकेने केले आहे. दरम्यान आणखी खास बाब म्हणजे गृहकर्जावरील 100% प्रोसेसिंग फी माफ असणार आहे.

गृहकर्ज कोणत्या ग्राहकांसाठी

ही ऑफर नव्याने गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी लागू असणार आहे. तसेच घराचे नूतनीकरण करणाऱ्यांनाही या ऑफरद्वारे गृहकर्ज मिळवता येणार आहे. कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरनुसार कर्ज दिले जाईल, असेही बँकेने म्हटले आहे. (Bank of Baroda Home loan offer) बँक ऑफ बडोदाचे मोबाईल अॅप, वेबसाइट किंवा थेट बँकेच्या ब्राँचमध्ये जाऊनही कर्जासाठी अर्ज करता येईल. 

बँक ऑफ बडोदा गृहकर्ज ऑफर

मर्यादीत कालावधीसाठी 8.50%* व्याजदर
झिरो प्रोसेसिंग फी 
कमीत कमी कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज मिळवा 
360 महिन्यांपर्यंतचा सुलभ कालावधी
प्रि-पेमेंट, पार्ट पेमेंट शुल्क लागू नाही
डिजिटल पद्धतीने 30 मिनिटातही कर्ज मिळवू शकता. 
मोठ्या शहरांत डोअरस्टेप सेवा मिळेल. 

MSME उद्योगांसाठीही अल्प व्याजदराची ऑफर (Bank of Baroda MSME loan offer)

गृहकर्जासोबतच बँक ऑफ बडोदाने लघु, सूक्ष्म आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योगांसाठी अल्प व्याजदरात कर्जाची ऑफर आणली आहे. MSME क्षेत्रातील उद्योगांना 8.40% पासून पुढे व्याजदरावर कर्ज मिळू शकते. ही ऑफरसुद्धा 31 मार्चपर्यंतच लागू असणार आहे. या कर्जावरील 50% प्रोसेसिंग फी माफ असणार आहे. कमी व्याजदरात कर्ज मिळवण्याची चांगली संधी MSME क्षेत्रातील उद्योगांना आहे.

सगळीकडे व्याजाचे दर वाढत असताना परवडणाऱ्या दरात गृहकर्ज देताना बँक ऑफ बडोदाला आनंद होत आहे. ही स्पेशल ऑफर मर्यादीत अवधीसाठी असणार आहे. MSME क्षेत्रातील उद्योगांनाही आमच्या खास ऑफरचा फायदा घेता येईल. नवउद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी आमच्या ऑफरचा फायदा होईल, असे बँकेचे कार्यकारी संचालक अजय खुराणा यांनी म्हटले आहे.

घरांची मागणी वाढली (Home demand in Maharashtra)

राज्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिकसह नागपूर शहरात घरांची मागणी कोरोनानंतर वाढत आहे. अनेक नवे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. व्याजदर वाढत असतानाही घरामध्ये गुंतवणूक करण्यास ग्राहक तयार आहेत. सध्या जागतिक स्तरावर मंदीचे सावट असून भांडवली बाजारही अस्थिर आहे. मागील दोन महिन्यांपासून शेअर बाजाराने निराशा केली आहे. सोन्याचे दरही वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत घरामधील गुंतवणूक हा चांगला पर्याय पुढे येत आहेत. कर्ज काढून गृहकर्ज घेण्याकडे नागरिकांचा कल आहे.