मे महिना सुरु व्हायला अगदी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. रिझर्व्ह बँकेने (RBI) मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील याबद्दल माहिती दिली आहे. यानुसार मे महिन्यात 12 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथ्या शनिवारबरोबरच आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. काही सुट्ट्या या ठराविक राज्यांसाठी लागू करण्यात आल्या आहेत.
मे महिन्यात 'या' दिवशी बँका राहणार बंद
मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी 1 तारखेला महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने बँका बंद असणार आहेत. त्यानंतर 5 मे ला बुद्ध पौर्णिमेच्या (Buddha Paurnima) निमित्ताने महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेशमधील बँकांना सुट्टी असणार आहे.
7, 14, 21 आणि 28 मे रोजी रविवार (Sunday) असल्याने आणि 13 मे व 27 मे रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा शनिवार असल्याने बॅंका बंद राहतील. अशाप्रकारे मे महिन्यात बँका 12 दिवस बंद असणार आहेत. त्यामुळे या सुट्टींच्या दिवशी ग्राहकांना ऑनलाईन बँकिंग व्यवहार (Online Banking Transaction) करावे लागणार आहेत. या 12 दिवसात ग्राहकांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत किंवा भरताही येणार नाहीत. पण पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी ते ATM चा वापर करू शकतात.