पैशांच्या अनेक व्यवहारांसाठी आपण बँकांवर अवलंबून असतो. आणि ऑनलाईन व्यवहारांचं प्रमाण वाढत असलं तरी सर्वसामान्य लोकांच्या बँकेच्या नियमित वाऱ्या चुकलेल्या नाहीत. त्यामुळे बँक हॉलीडे (Bank Holiday) नेमके कधी आहेत यांचं भान आपल्याला ठेवावंच लागतं.
त्यातच चालू डिसेंबर महिना हा नाताळ आणि न्यू ईयर सणांचा आहे. शिवाय तीन राज्यांतल्या निवडणूक निकालांचा हा महिना आहे. त्यामुळे 31 दिवसांपैकी तब्बल 14 दिवस हे बँकांसाठी सुट्यांचे आहेत. अर्थात, यातल्या काही सुट्या ठरावीक राज्यांनाच लागू होतील. आपण सुट्यांची ही यादीच बघूया.
डिसेंबरमधील बँक हॉलीडे (2022) - Bank Holidays in December 2022
3 डिसेंबर (शनिवार) - फिस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेविअर्स (गोवा)
5 डिसेंबर (सोमवार) - गुजरात विधानसभा निवडणुकांचं मतदान (गुजरात)
12 डिसेंबर (सोमवार) - पा तोगन संगमा (मेघालय)
19 डिसेंबर (सोमवार) - गोवा मुक्तीसंग्राम दिवस (गोवा)
24 डिसेंबर (शनिवार) - ख्रिस्मस ईव्ह
26 डिसेंबर (लोमवार) - खिस्मस
29 डिसेंबर (गुरुवारी) - गुरु गोविंद सिंगजी जयंती (चंदिगड)
30 डिसेंबर (शुक्रवार) - उ कियांग नांगबा (मिझोरम)
31 डिसेंबर (शनिवार) - न्यू ईयर्स ईव्ह
यातल्या बहुतेक सुट्या त्या त्या प्रांतातील बँकांना लागू होणार असल्या तरी दोन राज्यांतील बँकांमध्ये व्यवहार थांबल्यामुळे बँकिंग व्यवस्थेवर त्याचा परिणाम जाणवू शकतो. याशिवाय डिसेंबरमध्ये चार रविवार आणि दुसरा तसंच चौथा शनिवार अशा सहा सुट्याही आहेत.
4 डिसेंबर - रविवार
10 डिसेंबर - दुसरा शनिवार
11 डिसेंबर - रविवार
18 डिसेंबर - रविवार
24 डिसेंबर - चौथा शनिवार
25 डिसेंबर - रविवार
इतक्या सुट्या असल्या तरी ऑनलाईन आणि नेट बँकिंग सेवा सुरूच राहणार आहेत. आणि महाराष्ट्र राज्याला यातील नऊ सुट्या लागू होतील.