• 26 Mar, 2023 14:27

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Holidays in April 2023: एप्रिल महिन्यात 'या' दिवशी बँका राहणार बंद, जाणून घ्या बँक हॉलिडेज

Bank Holidays in April 2023

Bank Holidays in April 2023: चालू आर्थिक वर्ष 2022-2023 चे काहीच दिवस शिल्लक आहेत. एप्रिलमध्ये बँकांना 11 दिवस सुट्टी असेल. त्यामुळे ग्राहकांना बँकांची कामे करण्यासाठी एप्रिलमधील बँक हॉलिडेज तपासून नियोजन करावे लागेल.

Bank Holidays in April 2023: चालू आर्थिक वर्ष 2022-2023चे काहीच दिवस शिल्लक आहेत. ३१ मार्चनंतर १ एप्रिलपासून सुरु होत असलेल्या नवे आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये काही मोठे बदल पहायला मिळणार आहेत. एक मोठी गोष्ट जी सर्वांना लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे एप्रिल महिन्यात बँका किती दिवसांसाठी बंद (Bank Holidays in April 2023) राहणार आहेत. जर तुमचेही एप्रिलमध्ये बँकेशी संबंधीत कोणते काम आहे तर तुम्ही आतापासून प्लॅन करु शकता. आज आपण राज्यात यावर्षी एप्रिल महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? त्याची माहिती मिळवूया.

एप्रिल 2023 मध्ये 'या' दिवशी राहणार बँका बंद

 • शनिवार, १ एप्रिल २०२३: बँकेचे वार्षिक हिशेब पूर्ण करण्यासाठी
 • रविवार, २ एप्रिल २०२३: सुट्टी
 • मंगळवार, ४ एप्रिल २०२३: महावीर जयंती
 • शुक्रवार, ७ एप्रिल २०२३: गुड फ्रायडे
 • शनिवार, ८ एप्रिल २०२३: महिन्याचा दुसरा शनिवार
 • रविवार, ९ एप्रिल २०२३: सुट्टी
 • शुक्रवार, १४ एप्रिल २०२३: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
 • रविवार, १६ एप्रिल २०२३: सुट्टी
 • शनिवार, २२ एप्रिल २०२३: महिन्याचा चौथा शनिवार आणि ईद-अल-फित्र (रमजान ईद)
 • रविवार, २३ एप्रिल २०२३: सुट्टी
 • रविवार, ३० एप्रिल २०२३: सुट्टी

बँक हॉलिडे असाताना 'या' सुविधा उपयोगी पडतील

देशातील अनेक बँकांच्या कामकाजावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI - Reserve Bank of India) नियंत्रण असते. बँकांच्या सुट्ट्या आरबीआयच्या बँकिंग अॅक्टनुसार ठरवण्यात येतात. सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार कामकाज बंद असते. २०२३च्या एप्रिल महिन्याची पहिली सुट्टी शनिवार, १ एप्रिल २०२३ बँकेचे वार्षिक हिशेब पूर्ण करण्यासाठी पासून सुरु होईल. या दरम्यान एटीएम (ATM), कॅश डिपॉझिट (Cash Deposit), ऑनलाईन बँकिंग (Online Banking) आणि मोबाईल बँकिंग (Mobile Banking) पूर्णपणे काम करत राहतील.

Source: https://bit.ly/400dPRl