Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Account: तुम्ही किती बँक खाती ओपन करू शकता? आरबीआयचा नियम काय सांगतो?

Bank Account

Bank Account: बँक खात्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ग्राहक आपल्या सोयीनुसार देशात कोणत्याही बँकेत, कुठेही बँक खाते सुरू करू शकतात. आज आपण एक व्यक्ती किती बँक खाती ओपन करू शकतो आणि त्याबद्दल आरबीआयचा नियम काय सांगतो, याबद्दल जाणून घेणार आहोत.

हल्ली आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रत्येकाने बँकेत खाते ओपन केले आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, मासिक पगारासाठी किंवा पैसे साठवण्यासाठी या बँक खात्यांचा वापर केला जातो. या खात्यांचे प्रकार देखील वेगवेगळे असतात. बँक खात्यानुसार त्यावर मिळणाऱ्या सुविधा या देखील वेगवेगळ्या असतात. एका व्यक्तीकडे किती बँक खाती (Bank Account) असावी याबत रिझर्व्ह बँकेचा नियम (RBI Rule) नक्की काय सांगतो, जाणून घेणे गरजेचे आहे. आज त्याबद्दल जाणून घेऊयात.

आरबीआयचा नियम काय सांगतो?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार भारतात एका व्यक्तीजवळ किती बँक खाती (Bank Account) असावी याची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. लोक आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळी बँक खाती ओपन करू शकतात. देशात ग्राहक 2,3,4 किंवा 5 पेक्षा जास्त बँक खाती ओपन करून शकतात. मात्र ग्राहक ते खाते वापरणार नसतील, तर ते बंद करणे गरजेचे आहे. त्या बँक खात्यावर कोणताही आर्थिक व्यवहार झाला नाही आणि निश्चित बॅलन्स नसेल, तर ग्राहकांना दंड स्वरूपात ठराविक रक्कम भरावी लागू शकते.

बँक खात्यांचे प्रकार जाणून घ्या

बँकेच्या वतीने ग्राहकांना अनेक प्रकारची खाती उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार पगार खाते (Salary Account), चालू खाते (Current Account), बचत खाते (Saving Account) किंवा संयुक्त खाते (Joint Account) उघडू शकतात. बहुतांशी लोक बचत खाते उघडण्यासाठी प्राधान्य देतात. या खात्यावर ग्राहकांना व्याजदराचा लाभही देण्यात येतो. बचत खाते हे बेसिक खाते म्हणून ओळखले जाते. ग्राहकांनी कोणत्याही स्वरूपातील खाते ओपन केले, तर त्यांना डेबिट कार्ड,नेट बँकिंग क्रेडिट कार्डच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

पगार खाते Vs चालू खाते

व्यावसायिक दैनंदिन व्यवहार करतात. अशा ग्राहकांसाठी चालू खाते (Current Account) सुरू करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तर नोकरदार वर्गासाठी पगार खाते (Salary Account) सुरू करून दिले जाते. चालू बँक खात्यावरून सर्वात जास्त आर्थिक व्यवहार केले जातात. मात्र पगार खाते हे झिरो बॅलन्स (Zero Balance) असणारे खाते असते.यामध्ये महिन्याला ठराविक रक्कम बँक खात्यात कंपनीकडून जमा केली जाते.

Source: hindi.moneycontrol.com