Bangalore-Mysore Expressway: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी कर्नाटकातील बंगळुरू ते म्हैसूर महामार्गाचे अप्रतिम फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या महामार्गाचे उद्घाटन फेब्रुवारी 2023 मध्ये होण्याची अपेक्षा आहे. हा महामार्ग बेंगळुरूच्या बाहेरील NICE रोडजवळ सुरू होत असून म्हैसूरमधील आऊटर रिंग रोड जंक्शन पर्यंत कार्यान्वयीत होणार आहे.
बंगळुरू ते म्हैसूर महामार्गाच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू(President Draupadi Murmu) यांना आमंत्रित केले जाऊ शकते. या महामार्गामुळे प्रवासी श्रीरंगपटना शहराकडे न जाता थेट म्हैसूरहून मंड्याच्या दिशेने प्रवास करू शकतात.
या प्रकल्पासाठी 8,408 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 117 किमी लांबीच्या या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ अर्ध्यावर येणार आहे. यापूर्वी 3 तासाचा प्रवासासाठी लागणारा वेळ आता फक्त दिड तास लागणार आहे. हा महामार्ग तब्ब्ल 10 लेनचा असणार आहे.
महामार्गावरील वाहतुकीसाठी 6 लेन काम करतील. उर्वरित 4 लेन ग्रामीण वाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या महामार्गामुळे म्हैसूर, श्रीरंगपट्टणातील पर्यटनाचा विकास(development of tourism) होण्यास मदत होणार आहे.
या एकूण संपूर्ण महामार्गाच्या पट्ट्यामध्ये बिदाडी (7-किमी), रामनगरा आणि चन्नापटना (22-किमी), मद्दूर (7-किमी), मांड्या (10-किमी) आणि श्रीरंगपट्टना (7-किमी) येथे एकूण 6 बायपास देण्यात आले आहेत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि रस्ता सुरक्षा बांधण्यास मदत होणार आहे.