बंधनचा नवा फंड ऑफर (NFO) सोमवार 10 जुलै 2023 रोजी उघडणार आहे. तर सोमवार 24 जुलै 2023 रोजी तो बंद होईल. परवानाधारक म्युच्युअल फंड (Mutual fund) वितरक आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तसंच थेट https://www.bandhanmutual.com या संकेतस्थळावर बंधन वित्तीय सेवा निधीमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकणार आहे.
या फंडात गुंतवणूक का?
बंधन एएमसीचे सीईओ विशाल कपूर यांनी या फंडाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, की भारताच्या आर्थिक विकासाचा एक महत्त्वपूर्ण भाग वित्तीय सेवा क्षेत्राच्या माध्यमातून चालवला जातो. वाढत्या आर्थिक समावेशन आणि डिजिटलायझेशन यासोबतच बँका आणि एनबीएफसीच्या मजबूत बॅलेन्स शीटसारखे मुद्दे या सेक्टरसाठी मजबूत कमाईची शक्यता वाढवतात.
दीर्घकालीन विकासाचा लाभ घेण्याची संधी
भांडवल बाजारासाठी परताव्याचा हा एक प्रमुख घटक आहे. निफ्टी 500 निर्देशांकाच्या 10 पटीच्या तुलनेत वित्तीय सेवा निर्देशांक स्थापनेपासून 18 पटीनं वाढला आहे. ते म्हणाले, की बंधन फायनान्शियल सर्व्हिसेस फंड पारंपरिक बँकिंग क्षेत्राच्या पलीकडे जाऊन भांडवली बाजार, एनबीएफसी, विमा आणि फिनटेकमध्ये गुंतवणूक आणून गुंतवणूकदारांना देशाच्या दीर्घकालीन विकासाचा लाभ घेण्याची संधी देणारा आहे.
गुंतवणूकदारांना संधी
बंधन फायनान्शिअल सर्व्हिसेस फंडचे फंड मॅनेजर सुमित अग्रवाल म्हणाले, की वित्तीय सेवा क्षेत्र नवीन व्यवसाय आणि थीम स्वीकारण्यात सध्या पुढे आहे. यामुळे फंडासाठी एक चांगलं वातावरण आहे. बंधन फायनान्शियल सर्व्हिसेस फंड स्टॉक निवडीसाठी 3 फॅक्टर मॉडेल वापरणार आहे. निधी व्यवस्थापक स्टॉकच्या कमाईचा मार्ग, व्यवस्थापन गुणवत्ता आणि स्पर्धात्मक स्थिती यांना प्राधान्य देणार आहे. ज्यामुळे पोर्टफोलिओची गुणवत्ता आणि वाढ या दोन्ही पैलूंवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.