Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund NFO: एचडीएफसी म्युच्युअल फंडाची नवी योजना, 100 रुपयांपासून गुंतवणूक, वाचा सविस्तर...

Mutual Fund NFO: एचडीएफसी म्युच्युअल फंडाची नवी योजना, 100 रुपयांपासून गुंतवणूक, वाचा सविस्तर...

Mutual Fund NFO: म्युच्युअल फंड हाऊस एचडीएफसी म्युच्युअल फंडानं इक्विटी विभागातल्या कंझम्शनन थीमवर एक नवा थीमॅटिक फंड आणला आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडाची ही स्कीम लवकरच सुरू होणार आहे. विशेष म्हणजे केवळ 100 रुपयांपासून यात गुंतवणूक करता येणार आहे.

उत्कृष्ट परताव्यासाठी (Good return) अनेकांची पसंती म्युच्युअल फंडाला असते. आता म्युच्युअल फंड हाऊस असलेल्या एचडीएफसी म्युच्युअल फंडानं (HDFC Mutual Fund) आपल्या ग्राहकांसाठी एक नवी योजना आणली आहे. या नव्या एचडीएफसी नॉन-सायक्लीकल कन्झ्युमर फंडाचं (Non-Cyclical Consumer Fund) सबस्क्रिप्शन 23 जून 2023पासून सुरू होणार आहे. तर 7 जुलै 2023पर्यंत यात सहभागी होण्यासाठी मुदत असणार आहे. ही एक ओपन एंडेड स्कीम असणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदार त्यांना हवं तेव्हा ते रिडम्शन करू शकणार आहेत.

कंझम्शन कॅटेगरीतल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक

एचडीएफसी म्युच्युअल फंड हाऊस भारतातल्या सर्व कंझम्शन कॅटेगरीतल्या कंपन्यांमध्ये या योजनेतली गुंतवणूक करणार आहे. हा एनएफओ कंझम्शन इकोसिस्टममध्ये पोर्टफोलिओ बिल्डिंगसाठी बॉटम-अप अ‍ॅप्रोच स्वीकार करेल.

केवळ 100 रुपयांपासून गुंतवणूक

एचडीएफसीच्या या म्युच्युअल फंडानुसार, तुम्ही एचडीएफसी नॉन-सायक्लीकल कन्झ्युमर फंडात (HDFC Non-Cyclical Consumer Fund) किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकणार आहात. यामध्ये 365 दिवसांपूर्वी रिडीम केल्यास 1 टक्का एक्झिट लोड द्यावा लागणार आहे. योजनेचा बेंचमार्क निफ्टी इंडिया कंझम्शन टीआरआय (NIFTY India Consumption TRI) आहे. अमित सिन्हा हे या स्कीमचे फंड मॅनेजर आहेत.

नॉन-सायक्लीकल कंझ्यूमर थीमच्या स्टॉकला प्राधान्य

म्युच्युअल फंड या योजनेच्या वाटपाच्या 80 टक्के नॉन-सायक्लीकल कंझ्यूमर थीम असलेल्या स्टॉकमध्ये गुंतवेल. पोर्टफोलिओचं हे कोअर सेक्टर असेल. यामध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, ग्राहक सेवा, दूरसंचार, आरोग्यसेवा, मीडिया, मनोरंजन आणि प्रकाशनं यांचा समावेश आहे. या थीममध्ये 500 कोटींपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेल्या 300हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत.

गुंतवणूक कोणासाठी?

म्युच्युअल फंड हाउसनं दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकालीन संपत्ती किंवा उत्पन्न निर्माण करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. या योजनेतली गुंतवणूक नॉन सायक्लिक कंझ्यूमर थीमवर केंद्रीत आहे. यासोबतच इक्विटी आणि कंपन्यांच्या इक्विटीसंबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक असणार आहे.

एफडीला चांगला पर्याय

एफडी हा पर्याय गुंतवणुकीसाठी अधिक पसंत केला जातो. जोखीम नसलेल्या या पर्यायामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागते. व्याजदर अत्यंत कमी असतो. मात्र जोखीम नसल्यानं अनेकजण त्यात गुंतवणूक करतात. एचडीएफसी बँकेच्या एफडी व्याजदराचा विचार केल्यास साधारणपणे 7.75 टक्के इतका दर दिला जातो.

जोखीम जास्त

एचडीएफसीचा हा फंड व्हेरी हाय रिस्क या कॅटेगरीत मोडतो. रेग्यूलर आणि डायरेक्ट इन्व्हेस्टचे पर्याय यात देण्यात येतात. तर साधारणपणे 3 वर्षांच्या कालावधीसाठी यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. एचडीएफसी फंड या वेबसाइटवर यासंबंधीची अधिक माहिती उपलब्ध आहे.

(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)