अॅक्सिसच्या या फंडासाठी गुंतवणूकदार (Investors) 11 जुलै 2023पर्यंत अर्ज करू शकतात. ही एक ओपन एंडेड स्कीम (Open ended scheme) आहे. यामध्ये गुंतवणूकदार त्यांना हवं तेव्हा रिडम्प्शन करू शकणार आहेत. अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या (Asset management) मते, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. या नव्या योजनेत गुंतवणूकदार एसआयपी, एसटीपी आणि एकरकमी गुंतवणूक अशा विविध पद्धतशीर पर्यायांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात.
Table of contents [Show]
गुंतवणूक 5000 रुपयांपासून सुरू
अॅक्सिस म्युच्युअल फंड हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार, एखादी व्यक्ती अॅक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंडात किमान 5000 आणि त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक सुरू करू शकते. अॅक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंड निफ्टी आयटी टीआरआयला (फंडाचा बेंचमार्क इंडेक्स) ट्रॉक करेल. याचा उद्देश निफ्टी टीआरआयच्या एकूण रिटर्ननुसार एक्सपेंसेसच्या आधी रिटर्न जनरेट करणं असणार आहे. हा रिटर्न ट्रॅकिंग एररच्या अधिन असणार आहे. ट्रॅकिंग एरर बेंचमार्कच्या तुलनेत गुंतवणूक पोर्टफोलिओची सापेक्ष जोखीम असते. विशिष्ट फंडाच्या कामगिरीचं मोजमाप करण्यास मदत करते.
मासिक 1000 रुपयांच्या पटीत गुंतवणूक
एसआयपीवर नजर टाकल्यास या योजनेत मासिक 1000 रुपयांच्या पटीत आणि त्यानंतर 1 रुपये गुंतवू शकता. वार्षिक एसआयपी रक्कम 12000 रुपये असणार आहे. गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा यामध्ये नाही. या योजनेत अलॉटमेंटच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत रिडम्प्शन किंवा बाहेर पडल्यावर 0.25 टक्के एक्झिट लोड आकारला जाणार आहे. तर 7 दिवसांनंतर रिडम्प्शन किंवा बाहेर पडल्यावर एक्झिट लोड शून्य आहे.
'प्रॉडक्ट पोर्टफोलिओचा विस्तार'
अॅक्सिस एएमसीचे एमडी आणि सीईओ बी. गोपकुमार याविषयी माहिती देतात. ते म्हणतात, विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बदल घडवून आणण्यात आपला देश पुढे आहे. मागच्या तीन वर्षात हे दिसून आलं आहे. कोविडनंतर आम्ही आमची क्षमता दाखवून दिली आहे. तांत्रिकदृष्ट्या नवनवीन कल्पनांद्वारे आम्ही आमची वाढ करत आहोत. विशेष म्हणजे या डिजिटल क्षेत्रात सर्व कंपन्या कार्यरत आहेत. अॅक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंड लाँच करून आम्ही आमच्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओचा विस्तार करत आहोत. महत्त्वाचे म्हणजे, आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना भारताच्या या मजबूत तंत्रज्ञान कथेचा भाग बनण्याची संधी देत आहोत.
? NFO Launch Alert! ?
— Axis Mutual Fund (@AxisMutualFund) June 27, 2023
? Introducing the Axis Nifty IT Index Fund NFO! Invest in the future of technology-driven growth with us.
Don't miss out on this exciting investment opportunity!
Know more: - https://t.co/vJci6UhSmo
#AxisNiftyITIndexFund #NFO #InvestmentOpportunity pic.twitter.com/SFSt91oate
गुंतवणूक कोणासाठी फायद्याची?
फंड हाउसनं सांगितल्यानुसार, ज्यांना दीर्घकालीन संपत्ती निर्माण (Long term wealth creation) करायची आहे, असे गुंतवणूकदार अॅक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंड या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत निफ्टी आयटी टीआरआय स्टॉक्स बास्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला निर्देशांकानुसार (Index) परतावा मिळवण्याची संधी मिळेल. मात्र या योजनेच्या माध्यमातून गुंतवणुकीचं उद्दिष्ट साध्य होईल, याची कोणतीही हमी नाही.
निर्देशांकातल्या सर्व समभागांना स्थान
अॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या या इंडेक्स फंडाचा मुख्य उद्देश पोर्टफोलिओच्या संदर्भात स्टॉक मार्केट इंडेक्सची पुनरावृत्ती करणं हा आहे. निर्देशांकातल्या सर्व समभागांना त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये काहीना काहीतरी स्थान मिळेल. खासकरून हे पाहिलं जातं,की ट्रॅक केल्या जाणाऱ्या इंडेक्सप्रमाणे फंडाचा परफॉर्मन्स असायला हवा.