भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मे 2022 नंतर आत्तापर्यंत रेपो रेटमध्ये 250 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. ही वाढ झाल्यानंतर अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्या एफडीवरील (FD) व्याजदरात वाढ केली होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त गुंतवणूक मिळवण्यासाठी बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढले होते. मात्र आता अॅक्सिस बँकेने त्यांचे एफडीवरील व्याजदरात घट केली आहे. अॅक्सिस बँकेने एफडीवर 0.05% ते 0.20% पर्यंत व्याजदर कमी केला आहे. त्यामुळे जर तुम्हीही एफडीमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी नवे व्याजदर जाणून घ्या.
Table of contents [Show]
अॅक्सिस बँकेच्या एफडीवरील व्याजदर घट
अॅक्सिस बँकेने 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदर कमी केले आहेत. नवीन व्याजदरानुसार बँक 7 दिवसापासून ते 10 वर्षा पर्यंतच्या एफडीवर 3.5% ते 7.10% व्याज देत आहे. बँकेकडून 0.05% ते 0.20% व्याज कमी करण्यात आले आहे. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीचे नवीन व्याजदर जाणून घेऊयात.
7 दिवस ते 8 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी मिळेल एफडीवर इतका व्याजदर
7 दिवस ते 45 दिवस: : सर्वसामान्य ग्राहकांसाठी 3.50%, तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% व्याज देण्यात येत आहे.
46 दिवस ते 60 दिवस: सर्वसामान्य ग्राहकांसाठी 4%, तर ज्येष्ठ नागरिकांना 4% व्याज देण्यात येत आहे.
61 दिवस 3 महिन्यापेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्य ग्राहकांसाठी 4.50%, तर ज्येष्ठ नागरिकांना 4.50% व्याज देत आहे.
3 महिने ते महिन्यापेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्य ग्राहकांना बँक 4.75%, तर ज्येष्ठ नागरिकांना 4.75% व्याज देत आहे.
6 महिने ते 8 महिन्यापेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्य ग्राहकांना बँक 5.75%, तर ज्येष्ठ नागरिकांना 6.25% व्याज देत आहे.
8 महिने ते 1 वर्ष 11 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी इतके व्याज मिळेल
8 महिने ते 9 महिन्यापेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्य ग्राहकांना बँक 5.75%, तर ज्येष्ठ नागरिकांना 6% व्याज देत आहे.
9 महिने ते 11 महिने 25 दिवसांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्य ग्राहकांना बँक 6%, तर ज्येष्ठ नागरिकांना 6.50% व्याज देत आहे.
11 महिने 25 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्य ग्राहकांना बँक 6%, तर ज्येष्ठ नागरिकांना 6.50% व्याज देत आहे.
1वर्ष ते 1 वर्ष 4 दिवसांपेक्षा कमी: सर्वसामान्य ग्राहकांना बँक 6.75%, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.25% व्याज देत आहे.
1 वर्ष 5 दिवस ते 1 वर्ष 11 दिवसापेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्य ग्राहकांना बँक 6.80%, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याज देत आहे.
1 वर्ष 11 दिवस ते 10 वर्षातील एफडीवर मिळणार इतके व्याज
1 वर्ष 11 दिवस ते 13 महिन्यापेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्य ग्राहकांना बँक 6.80%, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.30% व्याज देत आहे.
13 महिने ते 2 वर्षापेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्य ग्राहकांना बँक 7.10%, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याज देत आहे.
2 वर्ष ते 30 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्य ग्राहकांना बँक 7.05%, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.55% व्याज देत आहेत.
30 महिने ते 10 वर्ष: सर्वसामान्य ग्राहकांना बँकेकडून 7%, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याज दिले जात आहे.
Source: www.moneycontrol.com