Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Axis Bank FD Rate Hikes: अ‍ॅक्सिस बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवले, नवीन व्याजदर जाणून घ्या

Axis Bank FD Rate Hikes

Image Source : www.fortuneindia.com

Axis Bank FD Rate Hikes: अ‍ॅक्सिस बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ 0.40 टक्क्यांनी झाली असून हे नवीन व्याजदर आजपासून (10 मार्च 2023) लागू झाले आहेत. नवीन मुदत ठेवीवरील व्याजदर जाणून घ्या.

आरबीआयने (RBI) महागाईला नियंत्रित करण्यासाठी रेपो दरामध्ये वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी त्यांच्या मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात वाढ करायला सुरुवात केली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेने देखील 2 करोडहून कमी रकमेच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ 0.40 टक्क्यांनी करण्यात आली असून हे नवीन व्याजदर आजपासून म्हणजेच 10 मार्चपासून लागू होणार आहेत.  गेल्या काही दिवसांपूर्वी अ‍ॅक्सिस बँकेने त्यांच्या व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अ‍ॅक्सिस बँकेने त्यांच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केल्याने बँकेच्या खातेधारकांना आणि नवीन ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

'या' मुदत ठेवींवरील वाढले व्याजदर

अ‍ॅक्सिस बँकेच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार बँकेने 13 महिने आणि 2 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात 40 बेसिस पॉईंटने म्हणजेच 0.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँक हा व्याजदर 6.75 टक्क्यांवरून 7.15 टक्क्यांवर घेऊन गेली आहे. बँकेकडून 2 वर्ष ते 30 महिन्यांच्या मुदत ठेवीवर सर्वात जास्त व्याजदर आकारला जात आहे. हा व्याजदर 7.26 टक्के इतका असून हा सुधारित व्याजदर असणार आहे.

2 करोडहून कमी रकमेवरील व्याजदर जाणून घ्या

  • 7 ते 14 दिवस: सर्वसामान्यांसाठी 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के
  • 15 ते 29 दिवस: सर्वसामान्यांसाठी 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के
  • 30 ते 45 दिवस: सर्वसामान्यांसाठी 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के
  • 46 ते 60 दिवस: सर्वसामान्यांसाठी 4.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.00 टक्के
  • 61 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सामान्य लोकांसाठी 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.50 टक्के
  • 3 ते 4 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सामान्य लोकांसाठी 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.75 टक्के
  • 4 ते 5 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सामान्य लोकांसाठी 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.75 टक्के
  • 5 ते 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सामान्य लोकांसाठी 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.75 टक्के
  • 6 ते 7 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सामान्य लोकांसाठी 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.00 टक्के
  • 7 ते 8 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.00 टक्के
  • 8 ते 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सामान्य लोकांसाठी 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.00 टक्के
  • 9 ते 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के
  • 10 ते 11 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के
  • 11 महिने ते 11 महिने 25 दिवसापेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के
  • 11 महिने 25 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधी: सामान्य लोकांसाठी 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के

एका वर्षाच्या कालावधीचा व्याजदर जाणून घ्या

  • 1 वर्ष  ते 1 वर्ष 4 दिवसापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी 6.75 टक्के;  ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के 
  • 1 वर्ष 5 दिवस ते 1 वर्ष 11 दिवसाहून कमी कालावधी: सामान्य लोकांसाठी  6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के 
  • 1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 24 दिवसांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के
  • 1 वर्ष 25 दिवस ते 13 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सामान्य लोकांसाठी 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.85 टक्के

13 महिने ते 2 वर्षापेक्षा कमी  कालावधीचा व्याजदर

  • 13 महिने ते 14 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के
  • 14 महिने ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के
  • 15 महिने ते 16 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के
  • 16 महिने ते 17 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के
  • 17 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सामान्य लोकांसाठी 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के
  • 18 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के
  • 2 वर्ष ते 30 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी: सर्वसामान्यांसाठी 7.26 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.01 टक्के