Budget 2023: भारतामध्ये आता एकाही सफाई कर्मचाऱ्याचा गटारात गुदमरुन मृत्यू होणार नाही. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेटमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन लोकसभेमध्ये बजेट 2023 सादर करत आहेत. या बजेटकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले आहे.
सफाई कर्मचाऱ्यांसाठी काय आहे घोषणा? (Machines will be used to clean drainage)
देशातील सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका, छोटी मोठी शहरे यामध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना तुंबलेली गटारं हाताने साफ करावी लागणार नाही. गटारे साफ करण्यासाठी फुल्ली अॅटोमॅटिक मशिन्सचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. गटार सफाई, तुंबलेली गटारे नीट करणे, दुरूस्ती अशी सर्व कामे आता हाय टेक मशिन्सद्वारे होणार आहेत. याबाबत बजेटमध्ये आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
भारतामध्ये मागील अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांना गटारे हाताने साफ करावी लागत होती. अनेक वेळा खोल गटारात उतरल्याने विषारी वायूने कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. एकाच वेळी चार पाच कर्मचारी गटारात उतरल्याने मृत्युमुखीही पडले आहेत. त्यावर आता यांत्रिकिकरणाचा उपाय आला आहे. हे सफाई कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. त्यांच्या सुरक्षेकडे केंद्र सरकारने लक्ष दिले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन लोकसभेमध्ये Budget 2023-24 सादर करत आहेत. या बजेटकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांबाबत महत्त्वाच्या घोषणा त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. रेल्वे खात्यासाठी बजेटमध्ये तब्बल 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे (Railway Budget 2023) कनेक्टिव्हिटीचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. मोदी सरकार 2.0 चे हे शेवटचे पूर्णवेळ बजेट आहे. यानंतर पुढीलवर्षी सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूश करण्यासाठी घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतातील सर्वात मोठ्या मध्यमवर्गाच्या हातात पैसा खेळता राहण्यासाठी सरकार काय उपाययोजना करतात, ते पहावे लागेल.