• 07 Dec, 2022 09:52

आजपासून ऑटो आणि टॅक्सीचा प्रवास महागणार!

Auto Rickshaw and Taxi fare in Mumbai

Auto Rickshaw and Taxi fare in Mumbai : आजपासून रिक्षासाठी 21 रुपयांऐवजी 23 रुपये, तर टॅक्सीसाठी 25 रुपयांऐवजी 28 रुपये मोजावे लागणार आहेत.

Auto Rickshaw Taxi fare Hike : आजपासून (दि. 1 ऑक्टोबर) मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाचा प्रवास अनुक्रमे 3 आणि 2 रुपयांनी महागला आहे. शनिवारपासून रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करताना नवीन दरानुसार भाडे द्यावे लागणार आहे. रिक्षाचे किमान भाडे 23 रुपये तर टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपये करण्यात आले.

मुंबई महानगर प्राधिकरणाने (MMRTA) रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाडीस मान्यता दिली आहे. त्यामुळे आजपासून रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करण्यासाठी अनुक्रमे 2 आणि 3 रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला या भाडेवाडीने आणखी कात्री बसणार आहे. (Auto Rickshaw and Taxi fare in Mumbai)

Auto taxi Fare Hike from 1st October
 

आजपासून रिक्षासाठी 21 रुपयांऐवजी 23 रुपये, तर टॅक्सीसाठी 25 रुपयांऐवजी 28 रुपये मोजावे लागणार आहे. रिक्षाच्या पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 23 रुपये तर त्यापुढे प्रत्येक किलोमीटरसाठी 15.33 रुपये द्यावे लागणार आहेत. तर टॅक्सीसाठी किमान 28 रुपये आणि त्यापुढे प्रत्येक किलोमीटरसाठी 18.66 रुपये द्यावे लागणार आहेत. कूल कॅबसाठी पूर्वी 33 रुपये द्यावे लागत होते. आता 40 रुपये लागणार आहेत आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 26.71 रुपये मोजावे लागणार आहेत.