Shark Tank India 2: शार्क टॅंक इंडिया 2 हा शो नुकताच सुरू झाला आहे. हा शो प्रसारित होण्यापूर्वी पासूनच याची चर्चा संपूर्ण देशात जोरदार होती. हा शो पाहणारा प्रेक्षकवर्गदेखील मोठा आहे. तसेच नवीन उद्योगजकांसाठी हा शो म्हणजे यशाची गुरूकिल्लीच आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. महाराष्ट्रील मध्यमवर्गीय कुटुंबातील पाटील काकूंना हा शो खूपच फायदेशीर ठरला आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे प्रोमो?
सोनी टीव्हीच्या सोशलमिडीया हँडलवरून आगामी भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये महिलेचे नाव पाटील काकू आहे, असे सांगण्यात आले आहे. ही 47 वर्षांची महिला आपल्या व्यवसायाची अनोखी कल्पना घेऊन या शो मध्ये पोहोचली आहे. या व्यासपीठावरून ती सांगते, पाच हजारापासून तिने छोटा स्नॅक्स उद्योग सुरू केला आहे. यावर जज विचारतात, तुमची या व्यवसायामध्ये किती विक्री होते. त्यावर त्या महिलेचा मुलगा म्हणतो, साधारण तीन कोटी रूपये इतकी आमची कमाई होते. पाच हजारापासून सुरू केलेला हा व्यवसाय, आज तीन कोटी रूपयांपर्यंत येऊन पोहोचला आहे. हे कानावर पडताच परिक्षक विनिता सिंह यांना मोठा आश्चर्यंचा धक्का बसतो.
काय आहे डील?
पाटील कांकूच्या या बिझनेसमध्ये परीक्षक पैसे गुंतवण्यासाठी तयार झाले आहेत. अमन गुप्ता आणि अनुपम मित्तल यांनी त्या महिलेच्या स्नॅक्स व्यवसायात तब्बल 40 लाख रुपये गुंतवणूक करण्याची ऑफर दिली. मात्र या काकूंना केवळ एकाबरोबर नाही तर चौघांबरोबर व्यवसाय करायचा आहे. हे ऐकल्यानंतर अनुपम मित्तल म्हणतात की, मग हे डिल आपल्याला बदलावे लागले. आता ही डिल पक्की होते की नाही हे आगामी भागातच कळेल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            