ईदच्या दिवशी रिलीज झालेला 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात चांगलाच गाजतोय. तब्बल 2 वर्षांनंतर सलमान खानला प्रेक्षक मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत पाहत आहेत. यापूर्वी शाहरुख खानच्या पठाण चित्रपटात सलमान खानने छोटी भूमिका साकारली होती. 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान खान सोबत साऊथ सुपरस्टार व्यंकटेश, जगपती बाबू, बॉक्सर विजेंद्र कुमार, राघव जुयाल, कै. सतीश कौशिक, पूजा हेगडे आणि शेहनाज गीलने इ. कलाकारांनी काम केले आहे. हिंदी भाषेसह हा चित्रपट चार दाक्षिणात्य भाषेत डब करण्यात आला आहे.
ईदीच्या निमित्ताने रिलीज झालेल्या या चित्रपटाला तीन दिवस झाले असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 150 करोड रुपयांचे आहे. फिल्म ट्रेंड अनॅलिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यांच्या माहितीनुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 21.61 करोड रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने नक्की किती कमाई केली, जाणून घेऊयात.
तीन दिवसांची बॉक्स ऑफिसवरील कमाई जाणून घ्या
फिल्म ट्रेंड अनॅलिस्ट तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार 'किसी का भाई किसी की जान'(Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात चांगली कमाई केली आहे. ईद आणि रविवारी सलग आल्याने या चित्रपटासाठी चित्रपटगृह हाऊसफुल्ल झालेली पाहायला मिळाली.
फिल्म रिलीजच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि. 21 एप्रिल) चित्रपटाने 15.81 कोटी रुपयांची कमाई केली. तर शनिवारी 25.75 कोटी रुपयांची कमाई करण्यात चित्रपटाला यश मिळाले. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी चित्रपटाने एकूण 26.61 कोटी रुपयांची कमाई केली. तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 68.17 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
चित्रपटाच्या यशाचे कारण काय?
या चित्रपटाचे पोस्टर ज्यावेळी रिलीज झाले, त्यावेळी पोस्टरवरील सलमान खानचा लूक हा प्रचंड चर्चेत आला होता. सफेद लुंगी आणि साऊथ लूकमधील सलमानला पाहायला प्रेक्षक आतुर झाले होते. याशिवाय त्याच्या या चित्रपटात साऊथ सुपरस्टार व्यंकटेश, जगपती बाबू आणि रामचरण या कलाकारांनी काम केले आहे.
या कलाकारांना दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा चाहता वर्ग असल्याने याचा फायदा सलमान खानला झाल्याचे बोलले जात आहे. तसेच अभिनेत्री शेहनाज गीलचा हा पहिलाच चित्रपट असल्याने लोकांना या चित्रपटाची आतुरता होती. बिग बॉसनंतर शेहनाजचा मोठा चाहता वर्ग तयार झाल्याने त्याचाही फायदा या चित्रपटाला झाल्याचे पाहायला मिळाले आहे. चित्रपटातील संगीत आणि सर्वोत्तम सीनमुळे या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
Source: hindi.moneycontrol.com