AU Small Finance Bank : AU स्माॅल फायनान्स बॅंकेने सुरू केलेल्या या सेवेमुळे ग्राहकांना खूप फायदा होणार आहे. कारण, सुट्टी असो की विकेंड AU ची टीम ग्राहकांसोबत व्हिडिओ काॅलद्वारे संवाद साधायला 365 दिवस आणि 24X7 उपलब्ध असणार आहे. अशा पद्धतीची सेवा पुरवणारी ही बॅंक पहिलीच असल्याचा दावा बॅंकेचे कार्यकारी संचालक, उत्तम टिबरेवाल यांनी केला आहे. या सेवेमुळे बॅंकेने डिजिटल बदल स्वीकारत नवे ध्येय गाठले आहे. ही सेवा पुरवणारे कर्मचारीही बॅंकेचेच असणार आहे, उदाहरणासाठी, तुम्ही यांना रविवारी रात्री 1 वाजता काॅल केला तरी कर्मचारी सेवा द्यायला उपलब्ध असणार आहेत. बॅंकेने ही सेवा देऊन, बॅंकिग क्षेत्रात महत्वाची कामगिरी केली आहे. तसेच, देशभर बँकिंग अनुभव वाढवण्याची बँकेची वचनबद्धता सिद्ध केली असल्याचे टिबरेवाल यांनी सांगतिले आहे.
Table of contents [Show]
400 पेक्षा अधिक सेवा उपलब्ध
बॅंकेने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ग्राहक 24×7 व्हिडिओ बँकिंग फीचर्सद्वारे 400 हून अधिक सेवा वापरू शकणार आहेत. तसेच, बॅंकेच्या वेबसाईटनुसार, या सेवांमध्ये पत्ता अपडेट करणे, लोनची चौकशी करणे, फिक्स्ड डिपाॅझिट (Fixed Deposit), फास्टटॅग रिचार्ज (Fastag Recharge), चेकबुकसाठी विनंती आणि अन्यही सुविधांचा समावेश असणार आहे. तसेच, ग्राहक या फीचर्सशिवाय त्यांचे सेव्हिंग अकाउंटही उघडू शकणार आहेत आणि व्हिडिओ बॅंकिंगचा वापर करून सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत त्यांच्या KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता बॅंकेत जाण्याची ही गरज राहणार नाही. या सुविधेचा वापर करून ग्राहकांना त्यांचा वेळ वाचवायला मदतच होणार आहे.
फीचर्ससाठी मजबूत सुरक्षा
बॅंकेने सुरू केलेल्या या सेवेसाठी सुरक्षाही महत्वाची आहे. त्या दृष्टिकोनातून बॅंकेने ग्राहकाच्या डिव्हाईसमधील डेटा बँकेच्या सर्व्हरवर ट्रान्सफर करण्यासाठी अॅडव्हान्स एनक्रिप्शन इन्स्टाॅल केले आहे. तसेच, ग्राहकाचा चेहरा ओळखण्यासाठी बॅंकेने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) प्रोग्रामही वापरला आहे. त्यामुळे ग्राहकच कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असल्याची पुष्टी होणार आहे. याचबरोबर, नेहमीच सुरक्षेसाठी वापरले जाणारे पर्याय जसे की, मोबाईल ओटीपी व्हेरिफिकेशन आणि वैयक्तिक प्रश्नही विचारले जाणार आहेत.
इंटरनेट असणे आहे आवश्यक
AU SFB च्या ग्राहकांचा चेहरा ओळखता यावा यासाठी व्यवस्थित प्रकाश असलेली खोली आणि चांगले इंटरनेट असणे आवश्यक आहे. तसेच, संवाद साधणाऱ्याचे वय किमान 18 वर्षे असावे आणि व्हिडिओ कॉल करत असताना बोलणारी व्यक्ती भारतात असणे गरजेचे आहे. बॅंकेच्या अधिकाऱ्याशी कनेक्ट होण्यासाठी तुम्ही स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप किंवा वेबकॅम आणि स्पीकरसह काॅम्प्युटर वापरू शकता.
बॅंकेची आत्तापर्यंतची वाटचाल
AU स्मॉल फायनान्स बॅंक (AU Small Finance Bank) लिमिटेड देशातील सर्वांत मोठी स्माॅल फायनान्स बॅंक आहे. राजस्थान राज्यातून या बॅंकेची सुरूवात झाली, आज सर्वत्र या बॅंकेच्या शाखा आहेत. बॅंकेची निव्वळ मालमत्ता 11,379 कोटी आहे तर डिपाॅझिट बेस 69,315 कोटी आहे. तसेच, बॅंकेला गुंतवणुकदारांचा पाठींबा प्राप्त आहे आणि बॅंक NSE व BSE या मुख्य स्टाॅक एक्सचेंजवर लिस्टेड आहेत.