रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) वाढत्या महागाईला आळा घालण्याच्या दृष्टिने रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर देशातील महत्त्वाच्या सार्वजनिक बॅंका स्टेट बॅंक ऑफ इंडियासह (State Bank of India), सेंट्रल बॅंक इंडिया (Central Bank of India), इंड्सइंड बॅंक (IndusInd Bank) आणि अॅक्सिस बॅंकेनी (Axis Bank) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली.
गेल्या महिन्यात आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केल्यानंतर बॅंकांसह सर्वसामान्यांना कर्ज महाग झालं. बॅंकांकडून कर्जाच्या मागणीतील वाढ लक्षात घेता बॅंकांनी आपला निधी वाढवण्यासाठी मुदतठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरूवात केली. गेल्या महिन्याभरात देशातील प्रमुख सार्वजनिक बॅंकांसह खासगी बॅंकांनी 2 कोटी रूपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली.
Table of contents [Show]
स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India)
![SBI New FD rate August 2022](https://mahamoney.com/storage/interest-rates-on-retail-domestic-term-deposits-below-rs-2-crore-interest-rates-revised-wef-13082022.png)
एसबीआयने (SBI) दोन कोटींहून कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.15 टक्क्यांची वाढ करत शनिवारपासून (दि.13 ऑगस्ट) नवीन दर लागू केले. यापूर्वी एसबीआयने 14 जून रोजी व्याजदरात वाढ केली होती. एसबीआयच्या नवीन व्याजदरानुसार, 1 ते 2 वर्षे, 2 ते 3 वर्षे, 3 ते 5 वर्षे आणि 5 ते 10 वर्षे या कालावधीसाठी अनुक्रमे 5.45 टक्के, 5.50 टक्के, 5.60 टक्के आणि 5.65 टक्के दराने व्याज मिळणार आहे.
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया (Central Bank of India)
![Central Bank of India FD rate August 2022](https://mahamoney.com/storage/central-bank-of-india-fd-rates.png)
सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने (Central Bank of India) ही 2 कोटींहून कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 10 ऑगस्टपासून वाढ केली. किमान 7 दिवस ते 555 दिवस या कालावधीत मुदत ठेवी ठेवल्यास त्यावर 2.75 ते 5.55 टक्के यादरम्यान व्याजदर मिळणार आहे. किमान 7 ते 14 दिवसांच्या ठेवीवर किमान 2.75 टक्के व्याज देत आहे.
अॅक्सिस बॅंक (Axis Bank)
![AXIS BANK FD RATES 2022](https://mahamoney.com/storage/axis-bank.png)
अॅक्सिस बॅंकेने 2 कोटींहून कमी रकमेच्या मुदत ठेवींवर नवीन व्याजदर 5 ऑगस्ट, 2022 पासून लागू केले आहेत. अॅक्सिस बॅंक (Axis Bank) 1 वर्षे 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवसांकरीता मुदतठेवींवर 5.75 टक्के व्याजदर देत आहे. 18 महिने ते 2 वर्ष आणि 3 ते 5 वर्षे या कालावधीसाठी अनुक्रमे 5.60 आणि 5.70 टक्के व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्षे 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवसांच्या मुदतठेवींवर 6.40 टक्के व्याज दिला जात आहे.
इंड्सइंड बॅंक (IndusInd Bank)
![IndusInd Bank FD rate 2022](https://mahamoney.com/storage/indusind-bank-fd-rates.png)
खासगी क्षेत्रातील इंडसइंड बॅंकेनेही (IndusInd Bank) 2 कोटीहून अधिक रकमेच्या मुदतठेवींवरील व्याजदरात वाढ लागू केली. नवीन दर 12 ऑगस्ट, 2022 पासून लागू झाले आहेत. बॅंकेने किमान 7 दिवस ते 10 वर्षांच्या ठेवींवर अनुक्रमे 3.50 टक्के व 6.75 टक्के व्याजदर ठेवला आहे. तर याच कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 4.25 टक्के व 7.50 टक्के व्याजदर दिला जात आहे.
आयसीआयसीआय (ICICI Bank)
![ICICI BANK FD RATES 2022](https://mahamoney.com/storage/icici-bank.png)
आयसीआयसीआय बॅंकेने (ICICI Bank) यापूर्वी 22 जून, 2022 रोजी मुदतठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर बॅंकेने 13 ऑगस्ट, 2022 रोजी पुन्हा एकदा मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. 7 ते 14 दिवसांच्या मुदतठेवींसाठी पूर्वी 2.75 टक्के दर होता. तो आता वाढवून 3.35 टक्के करण्यात आला. 1 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर पूर्वी 5.35 टक्के व्याजदर मिळत होता. नवीन दरानुसार आता तो 5.90 झाला आहे.
एफडीएससी (HDFC)
![HDFC FD RATE 2022](https://mahamoney.com/storage/hdfc-1.png)
एचडीएफसी बॅंक (HDFC) आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना 1 ते 2 वर्षांच्या कालावधीच्या ठेवींवर 5.35 टक्के व्याजदर देत आहे; तर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी 5.85 टक्के दर देत आहे. 2 ते 3 वर्षांच्या एफडींवर 5.50 टक्के आणि 3 ते 5 वर्ष कालावधीच्या एफडींवर 5.70 टक्के व्याजदर देत आहे. हे दर बॅंकेने 17 जून, 2022 पासून लागू केले आहेत.
खासगी बॅंकांकडून मुदत ठेवींवर दिले जाणारे व्याजदर | |||
बॅंक | कालावधी | सर्व ग्राहकांसाठी | ज्येष्ठ नागरिकांसाठी |
आयसीआयसीआय | 5 ते 10 वर्षे | 5.75 टक्के | 6.50 टक्के |
अॅ क्सिस बॅंक | 1 वर्षे 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवस | 5.75 टक्के | 6.40 टक्के |
एफडीएससी | 5 वर्षे ते 10 वर्षे | 5.75 टक्के | 6.50 टक्के |