• 09 Feb, 2023 07:29

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Athiya Shetty & KL Rahul: अथिया शेट्टी व के.एल.राहुल ग्रॅंड वेडिंग, कसा असणार आहे लग्नसोहळा आणि जाणून घ्या लव्हस्टोरी

Athiya Shetty & KL Rahul Grand Wedding

Image Source : http://www.hindustantimes.com/

Athiya Shetty & KL Rahul Grand Wedding: अथिया शेट्टी आणि केएल राहुलचा ग्रॅंन्ड विवाह सुरू झाला आहे. बाॅलिवुडमधील या राॅयल लग्नाचे कार्यक्रम तीन दिवस चालणार आहेत. पाहूयात हे भव्य-दिव्य लग्न कसे असणार आहे.

Athiya Shetty and KL Rahul Love Story: बाॅलिवुडचा सुपरस्टार सुनिल शेट्टी (Sunil Shetty) यांची मुलगी अथिया शेट्टी व भारतीय क्रिकेट टीमचा प्रसिध्द क्रिकेटर के.एल. राहूल याचा लग्नसोहळा मोठया थाटामाटात खंडाळा येथील फार्म हाऊसवर पार पडणार आहे. हा भव्य-दिव्य सोहळा कसा असणार आहे, हे पाहुयात.

अथिया शेट्टी व केएल राहुल लग्नाचे डिटेल्स (Athiya Shetty & KL Rahul Wedding Details)

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, अथिया शेट्टी व केएल राहुल हे 23 जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहे. हा लग्नसोहळा साधारण तीन दिवस चालणार असून 21  ते 23 जानेवारी दरम्यान लग्नाचे सर्व विधी पार पडणार आहेत. 21 व 22 जानेवारीला हळदी, मेहेंदी आणि संगीताचा कार्यक्रम होणार आहे. 23 जानेवारीला अथिया आणि केएल राहुल सात फेरे घेणार आहेत. हा ग्रॅंड लग्नसोहळा सुनील शेट्टीच्या खंडाळा बंगल्यावर होणार आहे.

अथिया शेट्टी व केएल राहुलच्या लग्नात 100 पाहुणे (100 guests at Athiya Shetty and KL Rahul's Wedding)

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, 23 जानेवारीला अथिया शेट्टी आणि केएल राहुल सात फेरे घेणार आहेत. त्यांच्या या ग्रॅंड लग्नाला फक्त दोघांचे कुटुंबच उपस्थित असणार आहेत. साधारण हा आकडा 100 पर्यंत जाणार आहे. यानंतर काही दिवसांनी बाॅलिवुड कलाकार व क्रिकेटरसाठी ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नात 'नो फोन पॉलिसी' ('No phone policy' at Athiya Shetty and KL Rahul's wedding)

या लग्नांमध्ये 'नो फोन पॉलिसी' असणार आहे. म्हणजेच या लग्नात कोणत्या ही येणाऱ्या पाहुण्यांकडील फोन जमा केले जाणार आहे. तसेच या ग्रॅंड लग्नाचे कोणतेही फोटो व व्हिडीओ पोस्ट करू नये हे सांगणार आहेत. बाॅलिवुडमध्ये यापूर्वी 'नो फोन पॉलिसी' हे अनेकवेळा पाहिले आहे.

अथिया शेट्टी व केएल राहूल लव्ह स्टोरी (Athiya Shetty and KL Rahul Love Story)

अथिया शेट्टी व केएल राहूल या जोडीनेदेखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या दोघे नेहमी एकत्रित असतानाचे फोटो सोशलमिडीयावर पोस्ट करीत असतात. त्यांच्या या फोटोला लाखोने लाइक्स मिळतात. काही चॅनल्सच्यानुसार, या दोघांची लव्हस्टोरी ही एका काॅमन फ्रेंडच्या माध्यमातून सुरू झाली. या काॅमन फ्रेंडच्या माध्यमातून ओळख झाली, मैत्री झाली मग शेवटी मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. म्हणतात ना, एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं बन सकते....हेच या जोडीच्याबाबतीतदेखील घडले.