प्रत्येक नोकरदार महिन्याच्या ठराविक तारखेला खात्यामध्ये पगार जमा होण्याची वाट पाहत असतो. काहीवेळेस पैशांची खूपच गरज असते. तर काही वेळेस कोणीची उधारी भागवायची असते. त्यामुळे पगाराच्या दिवशी बॅंकेचा मॅसेज कधी येतोय! याकडेच लक्ष लागून असते. असंच काहीसं चिली देशातील एका माणसाचं झालं होतं. पगाराच्या दिवशी त्याला बॅंकेचा अपेक्षित मॅसेजही आला. पण बॅंकेचा तो मॅसेज पाहून त्या कर्मचाऱ्याचे डोळे पांढरे पडले. असे का झाल्याचे कारण तुम्हाला कळले तर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
चिली येथील हा कर्मचारी येथील सर्वांत कोल्ड कट्सची (मांसाहरी पदार्थांची विक्री करणारी) सर्वांत मोठी कंपनी कॉन्सोर्सिओ इंडस्ट्रियल डी एलिमेंटोस (Consorcio Industrial de Alimentos - CIAL) येथे काम करत होता. या कर्मचाऱ्याला महिन्याला 5,00,000 चिली पेसो (भारतीय चलनात 43,000 रुपये) इतका पगार होता. त्यामुळे त्याला किमान एवढे पैसे बॅंकेत जमा होणे अपेक्षित होते. पण त्याच्या बॅंकेत कंपनीकडून जमा झालेली रक्कम पाहून त्याला सुरूवातीला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण कंपनीकडून त्याच्या बॅंकेत मासिक पगाराच्या 286 पट रक्कम पगार म्हणून जमा (Employee paid more accidentally) झाली होती. म्हणजे त्याच्या बॅंक खात्यात 165,398,851 चिलीयन पेसो (भारतीय चलनात 1.42 कोटी रूपये) जमा झाले होते.
कंपनीच्या अकाऊंट डिपार्टमेंटच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली. तेव्हा त्यांनी लगेच त्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधून चुकीने इतके पैसे जमा (Employee paid more accidentally) झाल्याचे सांगितले. यावर संबंधित कर्मचाऱ्यानेही जास्तीचे जमा झालेले पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. पण या कर्मचाऱ्याने चक्क कंपनीकडे नोकरीचा राजीनामा सादर करत तिथून पळ काढला आहे.
चिलीमधील या कर्मचाऱ्याच्या खात्यात कंपनीकडून पगाराच्या 286 पट रक्कम जमा झाल्यानंतर या पठ्ठ्याने कंपनीचा राजीनामा देत पोबारा केला आहे. कंपनी या माणसाचा शोध घेत आहे. पण तो गायब झाल्याची माहिती कंपनीला मिळाली आहे.
कॉन्सोर्सिओ इंडस्ट्रियल डी एलिमेंटोस (Consorcio Industrial de Alimentos - CIAL) कंपनीमधील एचआर विभागाने त्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला होता. तेव्हा त्या कर्मचाऱ्याने अधिकची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार जेव्हा कंपनीला बँकेकडून पैसे जमा झाल्याचा मॅसेज किंवा सूचना आली नाही. तेव्हा त्यांनी त्या कर्मचार्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याने काहीच रिप्लाय दिला नाही. उलट त्याने कंपनीचा राजीनाम देऊन गायब झाला आहे. कंपनीने आता या विरोधात कायदेशील पाऊल उचलले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.