Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aristo Bio Tech IPO: कृषी रसायन कंपनी, अॅरिस्टो बायो-टेकचा आयपीओ लवकरच बाजारात!

Aristo Bio Tech IPO

Image Source : www.chittorgarh.com

Aristo Biotech SME IPO will open soon: येत्या सोमवारी, 16 जानेवारी रोजी अॅरिस्टो बायोटेक ही कृषी रसायन क्षेत्रातील कंपनी आयपीओ लाँच करणार आहे. या आयपीओबद्दलचे सर्व तपशील पुढे वाचा.

Aristo Biotech SME IPO to open next week: अॅरिस्टो बायो टेकची (Aristo Bio-Tech)  प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO: Initial public offering)) येत्या सोमवारी म्हणजे, 16 जानेवारी 2023 रोजी सदस्यत्त्वासाठी (Subscription) शेअर बाजारात उघडणार आहे. या कंपनीचा आयपीओ (IPO) 19 जानेवारी 2023 पर्यंत सबस्क्राइब करता येणार आहे. अॅरिस्टो बायो टेकचे (Aristo Bio-Tech) शेअर्स एनएसई (NSE: National Stock Exchange) एसएमई  (SME: Small and Medium Enterprise) निर्देशांकावर सूचीबद्ध (Listed) केले जातील. या आयपीओद्वारे (IPO) कंपनी 13.05 कोटी रुपये उभारणार आहे.

किंमत बँड आणि लॉट आकार काय आहे? (What is the price band and lot size?)

प्राईज बँड (Price Band) म्हणजे शेअरच्या किमतीची खालची आणि वरची मर्यादा होय. तर, लॉट आकार (Lot Size) म्हणजे खरेदी करता येणारे शेअर्सची किमान संख्या होय. अॅरिस्टो बायोटेक आयपीओसाठी, कंपनीने प्रति शेअर 72 रुपये किंमत बँड निश्चित केला आहे. कंपनीने या आयपीओसाठी 1 हजार 600 शेअर्सचा लॉट साइज निश्चित केला आहे. याचा अर्थ या आयपीओवर पैज लावण्यासाठी 1 लाख 15 हजार 200 रुपये लागतील.

या आयपीओअंतर्गत, कंपनी 13.05 कोटी रुपयांचे 18 लाख 12 हजार 800 नवीन शेअर जारी करेल. या आयपीओअंतर्गत, कंपनीने गैर-संस्थात्मक बोलीदारासाठी  (NII: Non-institutional bidders) 50 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. उर्वरित 50 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.

कंपनीची माहिती (Information about the company)

अॅरिस्टो बायो-टेक अँड लाइफसायन्स लिमिटेड या कंपनीची स्थापना 2005 मध्ये झाली. ही एक कृषी रसायन कंपनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने विविध प्रकारच्या कीटकनाशकांचे उत्पादन, सूत्रीकरण, पुरवठा, पॅकेजिंग आणि जॉब वर्क सेवेमध्ये गुंतलेली आहे.

अॅरिस्टो बायो-टेक अँड लाइफ सायन्सेस भारतातील 20 राज्यांमध्ये आपली उत्पादने वितरीत करत आहे. कंपनी आपली उत्पादने आर्मेनिया, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बेल्जियम, कंबोडिया, जर्मनी, इटली, केनिया, मोल्दोव्हा, न्यूझीलंड, पोलंड, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती, युक्रेन आणि व्हिएतनाम सारख्या 15 हून अधिक देशांमध्ये विकते.

आयपीओचे पूर्ण वेळापत्रक (Full schedule of IPO)

अॅरिस्टो बायो टेक (Aristo Bio-Tech) आणि लाईफसायंस (Lifescience) यांते आयपीओ 16 जानेवारी 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल. त्याचे सदस्यत्व घेण्याची अंतिम तारीख 19 जानेवारी 2023 आहे. कंपनीच्या शेअर्सचे वाटप 24 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण केले जाऊ शकते. ज्या बोलीदारांना शेअर्सचे वाटप झाले नाही त्यांना 25 जानेवारी 2023 पासून परतावा मिळण्यास सुरुवात होईल. 26 जानेवारी 2023 रोजी समभाग यशस्वी बोलीकर्त्यांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 27 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.