Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधी घेण्यासाठी तुम्हीही आहात का अपात्र? जाणून घ्या

PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Yojna: पंतप्रधान किसान सन्मान निधी घेणारे सात लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. आता या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू झाली आहे. आतापर्यंत २६ कोटींची वसुली झाली आहे. राज्यात सात लाखांहून अधिक शेतकरी आहेत ज्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा गैरफायदा घेतला आहे. तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहात का जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

पंतप्रधान किसान सन्मान निधी घेणारे सात लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. आता या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू झाली आहे. आतापर्यंत २६ कोटींची वसुली झाली आहे. राज्यात सात लाखांहून अधिक शेतकरी आहेत ज्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा गैरफायदा (Disadvantage) घेतला आहे,  ही बाब भूलेख सर्वेक्षणात समोर आली आहे. अशा शेतकऱ्यांकडून वसुली (recovery) केली जात आहे. आतापर्यंत एकूण २६ कोटींची वसुली झाली आहे. 

11 वा आणि 12 व्या हपत्याची रक्कम 

दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या अशा शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी 6,000 रुपये निधी देते. परंतु गैरफायदा घेतल्याने या शेतकऱ्यांना निधीचा बारावा हप्ताही दिला जाणार नाही. या योजनेंतर्गत, यापूर्वी 11 वा आणि 12 वा हप्ता जारी करण्यात आला होता. 11 वा हप्ता म्हणून  राज्यातील 2.6 कोटी शेतकऱ्यांना 51,640 कोटी रुपये देण्यात आले.  12वा हप्ता म्हणून मिळालेले 48,324 कोटी रुपये वितरित केले जात आहेत. पडताळणीपूर्वी राज्यात युनिक नंबरधारक शेतकऱ्यांची संख्या 2,17,98,596 असल्याचे उघड झाले आहे. पडताळणीनंतर फक्त 2,10,87,849 चा डेटा बरोबर आढळला आहे. याचा नोंदीमध्ये समावेश करण्यात आला असून, एकूण 7,10,747 शेतकरी अपात्र ठरले आहेत. 

भूलेख सर्वेक्षणात समोर आलेली बाब 

पडताळणीपूर्वी शेतकऱ्यांची संख्या  

2,17,98,596

पडताळणीनंतर पात्र शेतकरी    +

2,10,87,849

अपात्र शेतकरी   =

7,10,747

कोणकोणत्या अपात्र लोकांनी घेतला निधीचा लाभ? 

  • अनेक अपात्र लोक पती-पत्नी दोघांचाही निधी घेत असल्याचे आढळून आले आहे.
  • आयकर रिटर्न (Income Tax Return) भरणारे मोठे शेतकरीही त्याचा फायदा घेत होते.
  • मृत्यूमुखी पडलेल्या सुमारे एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले आहेत.

तुम्ही देखील PM किसान योजनेसाठी अपात्र आहात का, चेक करण्यासाठी खालील स्टेप वापरा. 

  • तुम्ही सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे.
  • अधिकृत पोर्टलवर जाण्यासाठी इथे क्लिक करा. 
  • त्यानंतर तुम्हाला 'लाभार्थी स्थिती' (Beneficiary status) हा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. 
  • आता तुमच्या समोर एक नवीन स्क्रीन उघडेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक किंवा योजनेचा नोंदणी क्रमांक येथे टाकावा लागेल.
  • आता स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला स्टेटस दिसेल.
  • येथे तुम्हाला पात्रता (Eligibility) पर्यायामध्ये हे बघावे  लागेल की जर त्यासमोर 'नाही' लिहिले असेल तर याचा अर्थ तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अपात्र आहात.