Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

JITO Education Loan साठी अर्ज करा आणि मिळवा अल्प दरात शैक्षणिक कर्ज, जाणून घ्या डीटेल्स

JITO Education Loan

जैन समाजातील व्यापार, उद्योग आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी Jain International Trade Organization म्हणजेच JITO ही संस्था काम करते. जैनसमुदायातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत करण्यासाठी या संस्थेने JITO Education Loan ही योजना सुरु केली आहे.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी अनेक संस्था-संघटना देशभरात कार्यरत आहेत. Jain International Trade Organization म्हणजेच JITO ही एक संस्था जैन समुदायातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करते. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती JITO बद्दल…

जैन समाजातील व्यापार, उद्योग आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी ही संस्था काम करते. जैनसमुदायातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत करण्यासाठी या संस्थेने JITO Education Loan ही योजना सुरु केली आहे. ही योजना केवळ जैन समुदायातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठीच उपलब्ध आहे हे लक्षात असू द्या.

पात्रता निकष

  • विद्यार्थी हा भारतीय नागरिक असावा.
  • विद्यार्थी हा जैन समुदायातीलच असावा. 
  • विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी भारतातील किंवा परदेशातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवलेला असावा.
  • विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती आणि शैक्षणिक शुल्क यांचा ताळमेळ बसत नसेल तरच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. 
  • आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येणार नाही.
  • विद्यार्थ्याचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराने 10वी पासून सर्व शैक्षणिक स्तरांवर 50% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असावेत.
  • विद्यार्थ्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम संपूर्ण अभ्यासक्रमासाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक संस्थेकडून प्रवेश पत्र.
  • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पासपोर्ट इ.).
  • राहण्याचा पुरावा.
  • शैक्षणिक कागदपत्रे (गुणपत्रिका, प्रमाणपत्रे इ.).
  • अभ्यासक्रमाची फी रचना.
  • विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र/ आयकर रिटर्न 
  • सह-अर्जदाराची कागदपत्रे (लागू असल्यास).
  • जैन संघाचे शिफारसपत्र

कर्जाची रक्कम आणि परतफेड

  • संस्थेच्या वेबसाईटनुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करते. ही कुठल्याही  प्रकारची शिष्यवृत्ती नाही. शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी ही संस्था मदत करते आणि व्याजातील बहुतांश रक्कम ही संस्था भरते. 
  • जैन विद्यार्थिनीसाठी 4.5% दराने तर विद्यार्थ्यासाठी 5% दराने शैक्षणिक कर्ज दिले जाते. 
  • कर्जाची परतफेड विद्यार्थ्याचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर सुरू होते आणि एक अतिरिक्त कालावधी असू शकतो.

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ आहे. विद्यार्थ्यांना https://jitojeap.in/web/login या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. 
  • त्यांनतर आवश्यक ती माहिती वेबसाईटवर द्यावी लागेल. विद्यार्थ्यांचे खाते तयार झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. 
  • यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. 
  • आवश्यक ती कागदपत्रे पोर्टलवरच अपलोड करणे गरजेचे आहे. 
  • विद्यार्थ्याची निवड झाल्यास संस्थेकडून नोंदणीकृत इमेल आयडीवर सूचित करण्यात येते आणि फोन-एसएमएसद्वारे देखील माहिती दिली जाते. 

त्यांनतर संस्थेने ज्या बँकेशी करार केला आहे, त्या बँकेकडे विद्यार्थ्याचे प्रकरण वर्ग केले जाते आणि लोनसाठी सहाय्य केले जाते.  JITO च्या शैक्षणिक कर्ज कार्यक्रमाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी JITO ची अधिकृत वेबसाइट वेळोवेळी चेक करत राहा. त्यांच्या विविध योजनांची माहिती वेबसाईटवर वेळोवेळी अपडेट केली जाते.