Apple Saket : ॲपल कंपनीच्या भारतातल्या दुसऱ्या रिटेल शॉपचं काल उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी अनेक ॲपल प्रेमिंनी या शॉपला भेट देत खरेदीचा आनंद ही लुटला. या सोहळ्या प्रसंगी एक उल्लेखनीय गोष्ट घडली ती म्हणजे एका ॲपल चाहत्याला टिम कुक यांची स्वाक्षरी असलेला आयफोन 4S चे मॉडेल मिळालं. त्यामुळे चाहत्याचा आनंद द्विगुणित झाला.
नेमकं काय घडलं
दिल्ली साकेत स्टोरच्या उद्घाटनावेळी ॲपल प्रेमी लक्ष्या चोप्रा या युट्यूबरने आयफोन 4S चे मॉडेलची एक फ्रेम तयार केली होती. या फ्रेममध्ये मोबाईलचे सर्व पार्ट सुद्धा वेगवेगळे लावले होते. या फोनचं वैशिष्ट्ये म्हणजे टीम कुक जेव्हा सीईओ झालेले त्यावेळी त्यांच्या हस्ते या आयफोन मॉडेलचं लॉन्चिंग करण्यात आलेलं. त्यामुळे या फॅनने याच मॉडेलचे सर्व पार्टची एकत्रित फ्रेम तयार करून त्यावर टिम कुक यांची स्वाक्षरी घेतली. यावेळी त्याने टिम कुक यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत या आयफोन मॉडेलच्या विविध पार्टची माहिती दिली. तसंच आयफोन विषयी आपलं प्रेम व्यक्त केलं. चाहत्याच्या या कृतीने टिम कुक यांनाही आनंद मिळाला.
मुंबईतील चाहत्यांचं प्रेम
मुंबई बीकेसी स्टोअरच्या उद्घाटनावेळी मुंबईतील एका चाहत्यांने ॲपल कंपनीचं पहिलं ॲपल मॅशीनतोष कम्प्युटर सादर करत टीम कुक यांना सुखद धक्का दिला. टीम कुक हे सुद्धा ॲपलचं पहिल्या कम्प्युटरच मॉडेल पाहत अचंबित झाले. त्यांनी चाहत्याला मिठी मारत त्या मॉडेलवर आपली सही केली. तर दुसऱ्या एका चाहत्यांने नवीन खरेदी केलेलं आयपॅड तसंच पेटीपॅक ठेवून कुक यांच्या हस्ते ते ओपन करत त्यावर स्वाक्षरी मिळवली.
मुंबई व दिल्ली दोन्ही रिटेल शॉपच्या उद्घाटन प्रसंगी चाहत्यांनी ॲपल शॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत टिम कुक यांना भेटण्याची व त्यांच्या सोबत फोटो काढण्याची संधी मिळवली.