Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple ची प्रॉडक्ट महागली , किमतीत किती वाढ झाली ते जाणून घ्या

Apple

आता Apple ने HomePod मिनी स्मार्ट स्पीकरची किंमत वाढवली आहे. HomePod व्यतिरिक्त, 24-इंच iMac ची किंमत 10 हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र, Apple कडून किंमतवाढीबाबत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.

Apple ने अलीकडेच भारतात  32 हजार 900 च्या किमतीत HomePod (2nd Gen) लाँच केले आहे. आता कंपनीने HomePod मिनी स्मार्ट स्पीकरची किंमत वाढवली आहे. HomePod व्यतिरिक्त 24-इंच iMac ची किंमत 10 हजार  रुपयांपर्यंत वाढली आहे. होमपॉड मिनीची किंमत आता 10 हजार 900 रुपये आहे, जी आधी 9 हजार 900 रुपये होती. त्याचप्रमाणे, 7-कोर GPU आणि 256 GB स्टोरेजसह 24-इंच iMac ची किंमत आता 1 लाख 29 हजार 900 रुपये आहे, जी आधी 1 लाख 19 हजार 900 रुपये इतकी होती.

8-कोर GPU आणि 256GB स्टोरेजसह 24-इंच iMac ची किंमत आता 1 लाख 49 हजार 900 रुपये आहे, जी आधी 1 लाख 39 हजार 900 रुपये होती. 512 GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत आधी 1 लाख 59 हजार 900 रुपये होती, जी आता 1 लाख 69 हजार 900 रुपये झाली आहे. नवीन किंमतीसह सर्व उत्पादने Apple च्या ऑनलाइन स्टोअरवर पाहता येतील.

होमपॉड मिनी 2020 मध्ये 9 हजार 900 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. यामध्ये U1 चिप देण्यात आली आहे. हा स्पीकर घरापासून दूर नेल्यावर अलर्टही पाठवतो. यात चार फार फील्ड मायक्रोफोन आहेत. याशिवाय यात 360 डिग्री ऑडिओ बी आहे. यासोबत मल्टी रूम ऑडिओ आणि एअरप्लेसाठीही सपोर्ट आहे.24-इंचाच्या iMac मध्ये Apple M1 चिप आहे. यात 8 GB रॅम आणि 512 GB पर्यंत स्टोरेज आहे. यात 500 निट्स ब्राइटनेससह 4.5K रेटिना डिस्प्ले आहे. यात चार स्टुडिओ दर्जेदार स्पीकर आहेत.