Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

A New Smartwatch Launch: एक भन्नाट स्मार्टवॉच लाॅन्च, मनगटी घडयाळव्दारे घेता येणार मोबाईल काॅल

A New Smartwatch Launch

Image Source : http://www.90mobiles.com/

A New Smartwatch: सध्या स्मार्टवॉचची जोरदार फॅशन चालू आहे. त्यामुळे बाजारात विविध प्रकारचे स्मार्टवॉच येत असतात. आता एक असे स्मार्टवॉच आले आहे की, आता तुम्हाला मनगटी घडयाळाने आपल्या मोबाईलचा काॅल रिसिव्ह करता येणार आहे.

Maxima Max Pro Samurai: आज-काल नवनवीन मोबाईलप्रमाणेच बाजारात अनेक नवीन स्मार्टवॉच येत आहेत. या स्मार्टवॉचची बाजारात मोठी स्पर्धा असल्याची पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक कंपन्या नवनवीन फीचर्ससोबत नवनवीन स्मार्टवॉच लाॅन्च करीत आहेत. आता ही मेड इन इंडिया कंपनी असलेल्या Maxima कंपनीने भन्नाट Maxima Max Pro Samurai नावाचे स्मार्टवॉच बाजारात आणले आहेत.

स्मार्टवॉचचे नाव व किंमत (Smartwatch Name and Price)

Maxima Max Pro Samurai असे या स्मार्टवॉचचे नाव आहे. याची मेक इन इंडिया कंपनी आहे. यामध्ये 14 दिवसांचा बॅकअप मिळतो. तसेच हे घडयाळ हिंदी व इंग्रजी भाषेसह अनेक स्थानिक भाषेलादेखील सपोर्ट करतो. या स्मार्टवॉचची किंमत 1,499 रूपये आहे. हे घडयाळ तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमाव्दारे खरेदी करू शकता. तसेच हे घडयाळ वॉटरप्रुप असून 30 मिनिटांपर्यंत पाण्यात राहू शकते.  

स्मार्टवॉचचे फीचर (Features of Smartwatch) 

Max Pro Samurai या स्मार्टवॉचचे अनेक फीचर्स आहेत. यामध्ये 1.85 इंचचा मोठा डिस्प्ले आहे. तसेच याचा पीक ब्राइटनेस 600 निट्स असून या वॉच सोबत स्क्रीन लॉकची देखील सुविधा आहे. सोबतच 100 वॉच प्लस वॉच फेसेज आणि 100 प्लस स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहे. यासोबत प्रीमियम मेटलचे ऑयल फिनिशदेखील आहे.

मनजोत पुरेवाल प्रतिक्रिया (Manjot Purewal Reaction) 

मॅक्सिमा मॅक्स प्रो समुराई हे स्मार्टवॉच  ग्राहकाच्या गरजेनुसार तयार करण्यात आले आहेत. ग्राहकांना या स्मार्टवॉच मध्ये TWS (हेडफोन) वर कॉल रिसिव्ह करण्याची सुविधादेखील मिळणार असल्याचे मॅनेजिंग पार्टनर मनजोत पुरेवाल यांनी सांगितले.