Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Reserve : सोने साठवणुकीत अमेरिका अव्वल! भारताचा क्रमांक कितवा?

Gold Reserve

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने (World of Statistics) नुकतीच आपल्या ट्विटर अकाऊंटवर जगभरातील देशांजवळील सोन्याच्या साठ्याची यादी जाहीर केली आहे. जगभरातील या टॉप-10 देशांकडे सोन्याचा सर्वाधिक साठा आहे. यात पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका! 8 हजार 133 मेट्रिक टन सोन्याचा जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा अमेरिकेकडे असल्याचे या अहवालात म्हटले आहे. जाणून घ्या भारताचा क्रमांक या यादीत कितवा आहे...

सोने खरेदी करण्यात भारतीय नागरिक पुढे असतात असं म्हटलं जातं. तसे पाहायला गेले तर ते खरे देखील आहे. भारतीयांचे सोन्याविषयीचे प्रेम हे काही नवीन नाही. गेली अनेक शतके भारतीयांना सोन्याचा मोह आहे आणि तो अजूनही कायम आहे.

परंतु हे चित्र केवळ भारतातच नाहीये. जगभरात असे अनेक देश आहेत जे सोने खरेदीला पसंती देतात. जसे सामान्य नागरिक सोने खरेदीला पसंती देतात तसे देशाची सरकारे देखील सोने खरेदी करत असते. कारण हेच सोने अडीअडचणीच्या काळात देशाला उपयोगी पडत असते.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने (World of Statistics) नुकतीच आपल्या ट्विटर अकाऊंटवर जगभरातील देशांजवळील सोन्याच्या साठ्याची यादी जाहीर केली आहे. जगभरातील या  टॉप-10 देशांकडे सोन्याचा सर्वाधिक साठा आहे. यात पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका!  8 हजार 133 मेट्रिक टन सोन्याचा जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा अमेरिकेकडे असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

हे आहेत टॉप-5 देश 

अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर जर्मनी हा देश आहे. रिपोर्टनुसार जर्मनीकडे 3 हजार 355 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे. या आकडेवारीवरून पहिल्या क्रमांकावर असलेला अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीच्या सोने साठ्यातील तफावत लक्षात येईल.

या यादीत इटली 2 हजार 452 मेट्रिक टन सोन्यासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर  फ्रान्स 2437 टन सोन्यासह चौथ्या क्रमांकावर आहे. त्या खालोखाल रशिया 2330 टन सोन्याच्या साठ्यासह पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचा क्रमांक टॉप-5 देशांमध्ये नाहीये!

बाकी देशांचा नंबर कितवा?

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या या अहवालानुसार आपला शेजारी देश चीन 2113 टन सोन्याच्या साठ्यासह सहाव्या क्रमांकावर आहे. सातव्या क्रमांकावर स्वित्झर्लंड हा देश असून, त्यांच्याकडे 1 हजार 40 मेट्रिक टन सोने आहे.आठव्या क्रमांकावर जपान हा देश असून त्यांच्याकडे  846 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे.

जपाननंतर क्रमांक येतो तो भारताचा, 787 मेट्रिक टन सोन्याचा साठा असलेला आपला देश या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. म्हणजेच आपल्यापेक्षा सोन्याचा साठा इतर देशांकडे आहे हे या आकडेवारीनुसार समोर आले आहे. भारतानंतर दहाव्या क्रमांकावर आहे नेदरलँड हा देश. रिपोर्टनुसार नेदरलँडकडे 612 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे.