• 07 Dec, 2022 09:14

Amazon चा नवीन मोबाईल प्लॅन लॉन्च, Netflix ला देणार तगडी टक्कर!

Amazon Prime Video Mobile Plan

Amazon Prime Video Mobile Edition : ॲमेझॉनने भारतात प्राईम व्हिडिओच्या मोबाईल एडिशन प्लॅनची घोषणा केली. या प्लॅन अंतर्गत युजर्सना 1 वर्षांपर्यंत सब्स्क्रिप्शन मिळणार आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईमने नवीन मोबाईल एडिशन प्लॅन (Amazon Prime Video Mobile Plan) नुकताच भारतात लॉन्च केला. लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्व्हिसचा हा प्लॅन फक्त मोबाईल युजर्ससाठी असणार आहे. केवळ सिंगल युजर्सना हा प्लॅन ऑफर केला जातो. नेटफ्लिक्स, वुट्स आणि डिस्ने + हॉटस्टार यासारख्या व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिसेससोबत आता ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ स्पर्धा करणार आहे. 
ॲमेझॉन प्राईम व्हिडिओच्या मोबाईल एडिशनची (What is Amazon Prime Video Mobile Edition) किंमत 599 रुपये आहे. या प्लॅन अंतर्गत युजर्सना 1 वर्षांपर्यंत सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ ॲपवरून किंवा वेबसाईटवरून ॲक्सेस करता येणार आहे. (How to Use Amazon Prime)

599 रुपयांच्या प्लॅनची वैशिष्ट्ये (Amazon Prime Video Plan Details)

ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या नवीन मोबाईल प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ॲमेझॉन ओरिजनल शोज्, सिनेमे, लाईव्ह क्रिकेट यासारख्या कन्टेन्टचा ॲक्सेस मिळणार आहे. त्याचप्रमाणे ही स्कीम्स वापरकर्त्यांना स्टॅण्डर्ड डेफिनिशन गुणवत्तेत व्हिडीओ स्ट्रीमिंग देवू शकते. साधारणतः लहान स्क्रीनवर 480 पिक्सल व्हिडिओ क्वालिटीचा आनंद घेतला जावू शकतो. ॲमेझॉन ओटीटी प्लॅटफॉर्म महागड्या प्लॅनमध्ये 4 के पर्यंत रिसोल्युशन ऑफर करते.

[media url="https://www.youtube.com/watch?v=VmoRgrLRDTc"][/media]


स्टॅण्डर्ड ॲमेझॉन सब्स्क्रिप्शन प्लॅनची किंमत 1,499 रुपये!

स्टॅण्डर्ड ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ सब्स्क्रिप्शनची किंमत 1,499 रुपये आहे. 1 वर्षांपर्यंत वापरकर्त्यांना यात सब्स्क्रिप्शन मिळू शकते. हा एक मल्टीयुजर प्लॅन आहे. यामध्ये तुम्ही एचडी/ यूएचडी कन्टेन्ट ॲक्सेस करू शकता. मागील वर्षी फक्त प्रीपेड एअरटेल वापरकर्त्यांसाठी एअरटेलच्या सहकार्याने Amazon प्लॅन लॉन्च केला होता. यात त्यांना 30 दिवसांपर्यंत विनामूल्य टेस्टिंग मिळत होते. 28 दिवसांनंतर त्यांना 89 रुपये शुल्क भरावे लागणार होते. या प्लॅनची किंमत ही वार्षिक योजनेच्या तुलनेत खूपच कमी आहे.